Anuja Patil | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women's Day) जवळ येतो आहे. या दिनाच्या निमित्ताने जगभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा शोध घेऊन त्याबातब प्रसारमाध्यमांतून बहेच काही लिहून छापून येत आहे. या दरम्यानच एका कर्तृत्ववान महिलेचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. अनुजा पाटील (Anuja Patil) असे या महिलेचे नाव आहे. भारतातील खासगी क्षेत्रामध्ये (Private Sector) पहिल्या हायड्रो इंजिनिअर (India's First Woman Hydro Engineer) होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे. होय, ऊर्जा क्षेत्रातील महिलांच्या कामगिरीचा गौरव करताना त्यांच्या नावाचा उल्लेख जरुर करवा लागतो. खासगी क्षेत्रात हायड्रो इंजिनिअरींगमध्ये करिअर करण्यात आजवर एकाही महिलेला यश आले नव्हते. ते कर्तृत्व अनुजा यांनी दाखवले आहे.

टाटा पॉवरमधून करिअरला सुरुवात

अनुजा पाटील या टाटा पॉवरमध्ये सन 2011 मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून ऋजू झाल्या. तेव्हापासून आजपर्यंत (2011 ते 2024) त्यांनी आपला सक्रीय सहभाग नोंदवत 72MW खोपोली आणि 75MW च्या भिवपुरी जलविद्युत केंद्रांसाठी इंस्ट्रुमेंटेशन मेंटेनन्समध्ये मुख्य अभियंता म्हणून पद मिळवले. त्यांचा विभाग सध्या मुंबई आणि राज्याच्या इतर भागांमध्ये स्वच्छ ऊर्जा आणण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करतो आहे. (हेही वाचा, EV Charging Points: पुणे, नोएडा, सुरत भारतातील प्रमुख शहरांमध्ये लवकरच 25,000 टाटा पावर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉइंट्स)

अनुजा पाटील अल्पपरीचय

अनुजा पाटील यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कराड येथील विरवडे गावात झाला. अनुजा हिचे वडील दिलीप हे व्यवसायाने शेतकरी आणि आईही गृहिणी. त्यांची आई ग्रामीण भागातील असंख्य महिलांप्रमाणे पतीला शेतीमध्ये मोलाचा हातभार लावत असत. असे असले तरी अनुजा यांना नेहमीच मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळत असे. आपल्या प्रेरणेबद्दल त्या सुधा मूर्ती यांचा विशेष उल्लेख करतात. अनुजा यांनी पुणे येथील TELCO कंपनीत पहिल्यांदा अभियंता बनल्या. त्या सॅली राइड, भौतिकशास्त्रज्ञ, नासा संप्रेषक आणि अंतराळवीर यांच्याबाबतही भरभरुन बोलतात. त्या म्हणतात मी नेहमीच मोठी स्वप्ने पाहण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी कष्ट करण्याची माझी तयारी असते आणि त्या मुळेच आज मी हे लक्ष्य गाठू शकले आहे. (हेही वाचा, टाटा पॉवर आणि टाटा मोटर्सचे भारतात 300 Fast-Charging Stations उभारण्याचे लक्ष्य; पहिले तीन महिने मोफत चार्जिंगची सुविधा)

दरम्यान, आंतरराष्ट्रीय महिला दिन जवळ येत असल्याने जगभरातील कार्यतत्पर महिलांचा गौरव केला जात आहे. अशा वेळी अनुजा पाटील यांच्यासारखे व्यक्तीमत्त्व नक्कीच उठून दिसते. त्यांचे कार्य केवळ वैयक्तिक कर्तृत्वाचा उत्सवच नाही तर अभियांत्रिकी आणि इतर STEM क्षेत्रात प्रवेश आणि उत्कृष्ट कामगिरी करू इच्छिणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देणारी दिशाही ठरते. त्यांच्या यशामुळे इतरही अनेक महिलांना हायड्रो इंजिनिअरींगमध्ये करिअर करण्याची प्रेरणा मिळेल असे मानले जात आहे.