Amravati Violence: देवेंद्र फडणवीस यांनी काड्या न करता अमरावती शांततेसाठी प्रयत्न करावे- संजय राऊत

अमरावती हिंसाचार (Amravati Violence) प्रकरणावरुन शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानपरिषदेतील वरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आणि भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांनी हल्ला चढवत म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी राज्यात शांतता कशी राहिले हे पाहिले पाहिजे. अमरावती कशी शांत राहील हे त्यांनी पाहिले पाहिजे. फडणवीसांनी वादग्रस्त वक्तव्य करून काड्या करू नये, अशा शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. राज्यात ठाकरे सरकार आहे. हे सरकार गट, तट, पक्ष पाहून काम करत नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पेटवापेटवीचे राजकारण महाराष्ट्राला परवडणारे नाही. महाराष्ट्राची देशात एक वेगळी ओळख आहे. महाराष्ट्र हे देशात दंगलीसाठी प्रसिद्ध होऊ नये. राज्यात अमरावतीसारख्या घटना घडू नयेत यासाठी फडणवीस यांनी शांततेसाठी काम करावे. चिथावणीखोर वयक्तव्य करु नये. आगीत तेल टाकू नये, असेही राऊत यांनी म्हटले आहे. राज्यात शांतता आणि सुव्यवस्थेला प्राधान्य दिले जात आहे. अमरावती शेजारीच अससेल्या गडचिरोलीत महाराष्ट्र पोलिसांनी 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. कायदा सर्वांना सारका आहे. कायद्यासमोर सगळे सारखे आहेत, असेही संजय राऊत म्हणाले. (हेही वाचा,  'आम्ही योग्य पावले उचलली आणि दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राला 'स्वातंत्र्य' मिळाले'- शिवसेना खासदार Sanjay Raut यांचा टोला)

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. अमरावती हिंसाचार प्रकरणी देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशीस संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकासाघाडी सरकारने रझा अकादमी या संघटनेवर बंधी घालण्याची हिंमत दाखवावी असे म्हटले आहे.