मार्चमध्ये कोरोना व्हायरसने (Coronavirus) महाराष्ट्रात शिरकाव केला आणि राज्याचा चेहरामोहरा बदलून टाकला. राज्यात लॉकडाऊनसह (Lockdown) सर्व धार्मिळ स्थळेही (Religious Places) कोरोना व्हायरसमुळे बंद ठेवावी लागली. मात्र आता दीर्घकाळाच्या प्रतिक्षेनंतर 9 महिन्यानंतर ही धार्मिक स्थळे आजपासून भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. आपल्या देवाचे आपल्याला अखेर दर्शन घेता येणार असल्याने भाविकही प्रचंड खूश आहेत. राज्य सरकारने महत्त्वाची नियमावली घातली असून त्याचे पालन करणे सर्व धार्मिक स्थळांना बंधनकारक असणार आहे. तसेच भाविकांनीही मंदिर प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावे असेही राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे.
राज्यातील गजबजलेली आणि महत्त्वाची प्रार्थनास्थळे प्रभादेवीचे सिद्धीविनायक मंदिर, शिर्डीचे साईबाबा मधून, पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, , पुण्याचे दगडूशेट मंदिर यांसह अनेक धार्मिक स्थळे सुरु करण्यात आली आहेत. Mumbai's Siddhivinayak Temple: उद्यापासून उघडणार मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर; दिवसाला फक्त 1000 भक्तांनाच परवानगी, अॅपद्वारे करावे लागेल दर्शनाचे बुकिंग
Maharashtra: Devotees visit Mumbai's Siddhivinayak Temple as religious places reopen in the State today.
A devotee says, "I feel fortunate that I visited the temple in the new year, after Diwali. I'm very happy. All COVID-19 precautionary measures are being taken here." pic.twitter.com/L9Gvg15nSs
— ANI (@ANI) November 16, 2020
यामध्ये सिद्धीविनायक मंदिरात दर तासाला फक्त 100 भाविकांनाच दर्शन घेण्याची परवानगी आहे आणि दररोज 1000 भक्त सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊ शकतात. भाविकांना मंदिराचे अॅप डाऊनलोड करावे लागेल आणि आवश्यक माहिती भरावी लागेल. अशी माहिती मंदिराच्या विश्वस्तांनी दिली आहे. तर शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दिवसाला फक्त 6 हजार भाविकांनाच दर्शन मिळणार आहे व यासाठी ऑनलाइन बुकिंग करणे गरजेचे आहे. साई मंदिरात दर्शन घेताना कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यावेळी मास्क बंधनकारक असतील व सामाजिक अंतर पाळले जाईल. 65 वर्षांच्यावरील लोकांना दर्शनाची अनुमती नसेल.
तर तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात प्रतिदिनी फक्त 4 हजार जणानांच देवीचे दर्शन घेता येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्याचसोबत प्रत्येक 2 तासांनी 500 भाविकांना तुळजाभवानी मातेचे दर्शन घेता येणार आहे. तुळजभवानी मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावर दर्शन घेण्यासाठी पैसे देऊन पास आणि फ्री पास सुद्धा उपलब्ध असणार आहेत. परंतु देवीच्या दर्शनावेळी भाविकांना मुख्य गाभाऱ्यात प्रवेश बंदी असणार आहे. तसेच भाविकांना ऑफलाईन पद्धतीने पास मंदिर परिसरातून काढता येणार आहेत.