Shree Siddhivinayak Ganpati (PC - Facebook)

नुकतेच महाराष्ट्र सरकारने राज्यातील मंदिरे (Temples) व प्रार्थना स्थळे उघडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात उद्या, 16 नोव्हेंबरपासून मंदिरे भाविकांसाठी उघडली जातील. अशात विविध देवस्थाने भक्तांचे योग्यरीतीने व्यवस्थापन व्हावे यासाठी प्रयत्नशील आहेत. राज्यात शिर्डीचे साईबाबा मंदिर, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, महालक्ष्मी, मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर (Shree Siddhivinayak Temple), पुण्याचे दगडूशेट मंदिर याठिकाणी नेहमीच भक्तांची गर्दी असते. अशावेळी भाविकांची गर्दी होऊन कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. आता यासाठी मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक ट्रस्टने काही नियम घालून दिले आहेत.

यामध्ये दर तासाला फक्त 100 भाविकांनाच दर्शन घेण्याची परवानगी आहे आणि दररोज 1000 भक्त सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊ शकतात. भाविकांना मंदिराचे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल आणि आवश्यक माहिती भरावी लागेल.  आधार बांदेकर, अध्यक्ष, श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट, मुंबई यांनी ही माहिती दिली. सिद्धिविनायक मंदिर व्यवस्थापनाने भक्तांसाठी अनेक सेवा देणारे एक समर्पित अॅप सुरू केले आहे.

श्री.सिद्धिविनायक गणपती टेम्पल (Shree Siddhivinayk ganapti temple) असे हे अ‍ॅप असून, ते अँड्रॉईड किंवा अ‍ॅपल स्टोअरवर उपलब्ध आहे. अ‍ॅपमध्ये दर्शनाची वेळ आणि त्यासाठीच्या स्लॉटचे बुकिंग सूचीबद्ध केले आहे. मोबाईल फोनशिवाय भाविक मंदिरात नियुक्त केलेल्या काउंटरवर क्यूआर कोड तयार करून दर्शणाचे बुकिंग करू शकतात. एकदा का आपण ऑनलाईन अपॉईंटमेंट बुक केली की एक क्यूआर कोड मिळेल. दर्शन घेताना आपल्याला हा क्यूआर कोड दाखवाव लागेल.

मंदिरात येणार्‍या भाविकांना थर्मल स्क्रीनिंग आणि मास्क परिधान करणे अनिवार्य आहेत. ज्येष्ठ नागरिकांना दर्शन घेण्याची परवानगी नसेल. भाविक, दुपारची नैवेद्य आणि पूजेची वेळ आणि संध्याकाळची धुपाआरती आणि आरती वेळ या व्यतिरिक्त सकाळी 7 वाजल्यापासून एक-एक तासाच्या सॉल्टमध्ये दर्शनाच्या वेळेचे बुकिंग करू शकतात. (हेही वाचा: तुळजाभवानी मंदिर अखेर 8 महिन्यांनंतर भाविकांसाठी उडले जाणार; 'या' नियमांचे पालन करावे लागणार)

दरम्यान, महाराष्ट्रात 8 महिन्यांनंतर सर्व धार्मिक स्थळे 16 नोव्हेंबरपासून म्हणजे सोमवारी उघडतील. राज्य सरकारने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. मंदिरातील भक्तांनी कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करणे बंधनकारक आहे.