Uday Samant | (Photo Credit - Twitter)

राज्यात कोरोनाचा (Corona) प्रसार मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विभागीय आयुक्त, कुलगुरू, शिक्षण अधिकारी यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीच्या माध्यमातून काही निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून सुरक्षितता प्राधान्यस्थानी आहे. प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे तसेच, हा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा प्राधान्यस्थानी आहे. त्यामुळेच सर्व अकृषी विद्यापिठे, अभिमत विद्यापिठे, स्वयंअर्थसहाय्यक विद्यापिठे, तंत्रनिकेतन, विद्यापिठांची संलग्न महाविद्यालयाचे वर्ग हे 15 फेब्रुवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे.

Tweet

दरम्यान, सर्व अकृषि विद्यापीठे, विद्यापीठांशी संलग्नित विद्यापीठे, स्वयंम अर्थसहाय्य विद्यापीठे, तंत्रनिकेतनशी संबंधित परिक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णयदेखील बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. याशिवाय महाविद्यालयांसोबतच वस्तीगृहेदेखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे विद्यार्थी परदेशातून व इतर राज्यातून संशोधन करण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यासाठी वस्तीगृहाची सोय सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे. (हे ही वाचा Maharashtra Corona, Omicron Lockdown: लॉकडाऊन तुर्तास तर नाही, निर्बंध मात्र कठोर होणार; उच्चस्तरीय बैठकीत उमटला सूर.)

कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने  शाळांबाबतही मोठा निर्णय घेण्यात आलाय आहे. दुसरीकडे वाढता कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे महाविद्यालये बंद केली तरी ऑनलाईन शिक्षण मात्र सुरू राहणार आहे.

शाळा पुन्हा बंद ठेवण्याच निर्णय

कोरोनाचा वाढता कहर आणि ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका लक्षात घेता मुंबई, ठाणे, पुणे या शहरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईमध्ये पहिली ते नववीपर्यंतचे वर्ग 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तर पुणे आणि ठाण्यामधील पहिली ते आठवीचे वर्ग 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.