अकोला जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: अकोट ते मुर्तिजापूर मधील उमेदवार, महत्वाच्या लढती आणि निकाल जाणून घ्या
अकोला विधानसभा मतदारसंघ आढावा (Photo Credits-File Image)

विदर्भातील महत्वाच्या मतदार संघापैकी एक राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचा भाग आहे. अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 5 मतदारसंघ येतात. त्यानुसार अकोट, अकोला पूर्व, बळापूर, अकोला पश्चिम आणि मुर्तिजापूर अशी मतदारसंघांची नावे आहेत. तर यंदाच्या विधासभा निवडणूकीसाठी शिवसेना-भाजप महायुतीसह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, मनसे आणि बहुजन आघाडी पक्ष कोणाला कशी टक्कर हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रात एकूण 287 मतदारसंघ आहेत.

-मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक 32

मुर्तिजापूर हा अकोला जिल्ह्यातील विधानसभेचा एकमेव राखीव असलेला मतदारसंघ आहे. मुर्तिजापूर हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. सध्या येथे भाजपचे विद्यमान आमदार हरीष पिंपळे आहेत. 2014 मध्ये भारिपचे राहुल डोंगरे यांना 41,338 मत मिळत पराभव स्विकारावा लागला होता. तर यंदाच्या निवडणूकीसाठी मुर्तिजापूर येथून पुन्हा एकदा पिंपळे यांना भाजप कडून रिंगणात उतरवले आहे. पिंपळे यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीकडून रविकुमार राठी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

-अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ क्रमांक 31

. विदर्भातील महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणून अकोला पूर्व मतदारसंघाला ओळखले जाते. शहरी आणि ग्रामीण असा संमिश्र नागरी वास्तव्य असलेला हा मतदारसंघ आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे. सध्या या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार रणधीर सावकर आहेत. 2014 मध्ये सावरकर यांच्या विरोधात भारिप हरिदास भदे यांना उमेदवारी दिली आहे. पण त्यावेळी भदे यांचा 51,238 मतांनी पराभव झाला होता. सध्या पुन्हा भाजपने सावरकर यांना तिकिट दिले असून त्यांच्या विरोधात विवेक पारस्कर यांना काँग्रेसकडून उतरवण्यात आले आहे.

-अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ क्रमांक 30

गेल्या पंचवीस वर्षांत अनेक राजकीय लाटा आणि वादळे आली पण या मतदारसंघावरील भाजपची पकड सैल झाली नाही. त्यामुळे सध्या ही येथे भापचे विद्यमान आमदार गोर्धन शर्मा आहेत. 2014 मध्ये ही शर्मा यांना रिंगणात उतरवण्यात आले होते. तेव्हा शर्मा यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे विजय देशमुख यांचा 26981 मतांनी पराभव झाला होता. यंदाही शर्मा यांना रिंगणात उतरवण्यात आले असून त्यांच्या विरोधात काँग्रेसने साजिद खान मन्नन खान (पठाण) यांना उमेदवारी दिली आहे.

-बाळापूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक 29

कधीकाळी मुघलांची या भागातील राजधानी म्हणून बाळापूर ओळखले जाते. अकोला जिल्ह्यातील राजकीय प्रयोगांची भूमी म्हणजेच बाळापूर विधानसभा मतदारसंघ आहे. भारिपचे येथे सध्या विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार आहेत. 2014 मध्ये अॅड. नतिकोद्दीन खतीब, काँग्रेसचे यांचा 34,487 मतांना पराभव झाला होता. यंदा ही नितीन देशमुख यांना शिवसेनेकडून तिकिट दिले असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे संग्रमा गावंडे यांना उमेदवारी दिली आहे.

-अकोट विधानसभा मतदारसंघ क्रमांक 28

अकोला जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदारसंघात एकदा निवडून आलेला आमदार परत दुसऱ्यांदा निवडून येत नाही. या मतदारसंघाने 1985 पासून आपला हा अलिखित नियम अगदी कसोशीने पाळला आहे. सध्या येथे भाजपचे विद्यमान आमदार प्रकाश गुणवंतराव भरसाकळे आहेत. 2014 मध्ये काँग्रेसचे महेश गणगणे यांचा 38,675 मतांनी पराभव झाला. यावेळी भरसाकळे पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात संजय बोडके यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 येत्या 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तसेच या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवत एक हाती सत्ता मिळवली होती. परंतु, या विधानसभेत कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.