Akola Car Accident: शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा
Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अकोला (Akola)  मध्ये पातूर (Patur) शहरात एका भीषण रस्ते अपघातात दोन दुचाकी समोरा समोर धडकल्याने भीषण अपघात झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये शिक्षक किरण सरनाईक (Kiran Sarnaik) यांच्या भावाच्या कारचा समावेश होता. सरनाईक कुटुंबातील चार जण त्यामध्ये मृत्यूमुखी पडले आहेत. तर दुसर्‍या कार मधील दोघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये दोन्ही कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

किरण सरनाईक यांचा भाऊ, भावाचा मुलगा, मुलगी आणि नात प्रवास करत होते त्यांचा मृत्यू झाला आहे. पातूर शहरातील पुलाजवळ आज दुपारी हा अपघात झाला आहे. एकाच वेळी चार जणांच्या मृत्यूमुळे किरण सरनाईक यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सध्या अपघातातील मृतांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत.

किरण सरनाईक हे अमरावतीमधील शिक्षक आमदार आहे. या घटनेची माहिती मिळताच ते देखील अकोलाला रवाना झाले आहेत. पोलिसांकडून या अपघात प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. वाशिम कडून अकोला कडे जात असताना सरनाईकांच्या गाडीला हा अपघात झाला आहे. काही जखमींवर अकोलाच्या हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.