Akhilesh Shukla Suspended: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) अधिकारी अखिलेश शुक्ला (Akhilesh Shukla) यांना कल्याणच्या योगीधाम परिसरात एका मराठी कुटुंबावर हल्ला आणि शिविगाळ केल्याप्रकरणी निलंबित (Akhilesh Shukla Suspended)करण्यात आले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्ला यांच्यावर देशमुख कुटुंबावर हल्ला केल्याचा आरोप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा निषेध करत, “महाराष्ट्र हा मराठी माणसांचा आहे,” असे सांगून शुक्ला व इतरांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले'.(Kalyan Marathi Family: मराठी माणसावर हल्ला करणाऱ्या शुक्लावर कायदेशीर कारवाई करा, अन्यथा रस्त्यावर उतरेल; उल्हास भोईर यांचा इशारा)
मराठी कुटुंबावर हल्ला करणारा अखिलेश शुक्ला निलंबित
कल्याण येथील मारहाण घटनेतील दोषींवर कडक कारवाई केली जाईल. मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचा होता, आहे आणि राहिल— मुख्यमंत्री @Dev_Fadnavis#विधानपरिषद#हिवाळीअधिवेशन२०२४#Wintersession2024#WinterAssemblySesssion2024 pic.twitter.com/OGuT0PEsiA
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 20, 2024
दोन भावांना लोखंडी रॉडने मारहाण
गुंडांना सुपारी देऊन त्यांनी दोन भावांना लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. शुक्ला आणि त्यांच्या पत्नीने मराठी लोकांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली आणि कुटुंबावर हल्ला केल्याने मराठी जनतेत सध्या संतापाची लाट आहे. या हल्ल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले असून, संपूर्ण महाराष्ट्रात जनक्षोभ उसळला आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले
जे माज करतात त्याचा माज उतरल्याशिवाय शांत बसणार नाही. मराठी माणूस कुणाच्या काळात बाहेर गेला, वसई-विरारला गेला याचा शोधही घ्यायला हवा. मराठी माणूस 300 स्क्वेअर मीटरमध्ये राहतो. मोठ्या फ्लॅटमधे कोण राहतो, याचा शोध घायला हवा. उत्तर प्रदेश, बिहारमधून इथे आलेले लोक आपल्यासारखे मराठी उत्तम बोलतात. आपल्यासारखेच सण उत्सव साजरा करतात. मात्र, काहीजण चुकीचं बोलतात. त्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला धक्का लागतो. त्यांना ठणकावून सांगतो मराठी माणसावर अन्याय होऊन देणार नाही. घर नाकारण्याचा अधिकार कुणाला नाही. एखाद्या समाजाला शाकाहार महत्त्वाचा वाटतो.
शाकाहार पुरस्कार करणारे कोणी असेल तर त्याबाबत तिरस्कार करण्याचे कारण नाही. मात्र याचा फायदा घेऊन कोणी भेदभाव करत असेल तर ते मान्य होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. अशा तक्रारी आल्या तर त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल. राष्ट्रीय अस्मितेनंतर मराठी ही आपली क्षेत्रीय अस्मिता आहे, त्यावर कोणी घाला घालणार असेल, तर त्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.