Ajit Pawar | Twitter

आयुष्याची 70 वर्ष संघाचा प्रचार करण्यासाठी व्यतित करणार्‍या मदन दास देवी (Madan Das Devi) यांनी काल (25 जुलै) बेंगलूरू मध्ये अखेरचा श्वास घेतला. आज पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधीपूर्वी मोतिबाग या पुण्यातील संघाच्या कार्यालयात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनाला ठेवलं होतं. यावेळी भाजपाचे नेते, संघाचे कार्यकर्ते यांच्यासोबत शिंदे-फडणवीस सरकार मध्ये नव्याने सहभागी झालेले अजित पवार (Ajit Pawar) देखील नतमस्तक होताना दिसले. एनसीपी गटाचे नेतृत्त्व करणार्‍या अजित पवारांनी पूर्वीच्या वैचारिक मतभेदांना दूर सारून संघाच्या कार्यालयात हजेरी लावलेली आज पहायला मिळाली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अमित शहा आणि अजित पवारांची देखील आज भेटीची ही पहिलीच वेळ आहे.

अजित पवार अमित शहा यांच्या भेटीला

पुण्यामध्ये काल दाखल झालेल्या अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या शोकसभेनंतर खाजगीमध्ये भेट घेतली आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्री पदाचा कारभार अजित पवार यांना दिला जाईल अशा चर्चांना कालपासून उधाण आलं आहे. नक्की वाचा: Maharashtra Politics: 'एकनाथ शिंदेच राहणार राज्याचे मुख्यमंत्री', अफवांच्या पार्श्वभूमीवर DCM Devendra Fadnavis यांचे स्पष्टीकरण (Watch Video) .

कोण होते मदन दास देवी?

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदला मजबूत करण्यामध्ये मदन दास देवी यांचं मोलाचं काम आहे. 1970 ते 1992 पर्यंत ते ABVP च्या राष्ट्रीय संघटनेचे सरचिटणीस होते. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात सहकारभारी असताना ते सरकार आणि राज्य यांच्यातील समन्वयाचे काम पाहत असतं. सीए गोल्ड मेडलिस्ट असूनही त्यांनी आपलं सारं जीवन संघाच्या कामासाठी अर्पण केले होते. अरूण जेटली, नितीन गडकरी, विनोद तावडे असे अनेक नेते त्यांच्याच मुशीत तयार झाले आहेत.