Maharashtra Dy CM swearing-in Ceremony: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये (Maharashtra Vidha Sabha Election) महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आज आझाद मैदानात शपथविधी सोहळा पार पडणार आहे. संध्याकाळी 5.30 च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा रंगणार आहे. त्यामध्ये मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार (Ajit Pawar) शपथ घेणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली जात आहे. दरम्यान पहिल्यांदाच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार आहेत पण अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत नवा विक्रम रचणार आहेत. नक्की वाचा: अजित पवार, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का? शिंदेंआधी दादांनी दिलं उत्तर आणि सार्यांनाच हसू अनावर (Watch Video).
अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री
सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर मीडीयाशी बोलताना अजित पवारांनी आपण उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचं जाहीर केले आहे. पण यंदाची त्यांची उपमुख्यमंत्री म्हणून शपथ खास ठरणार आहे. चार विविध मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची सहाव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून ही शपथ असणार आहे.
अजित पवार यांनी पहिल्यांदा 10 नोव्हेंबर 2010 मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यानंतर पुन्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून 25 ऑक्टोबर 2012 ते 26 सप्टेंबर 2014 पर्यंत अजित दादा उपमुख्यमंत्री होते.
2019 च्या महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यामध्ये देवेंद्र फडणवीसांसोबत 80 तासांच्या सरकार मध्ये अजित पवार 23 ते 26 नोव्हेंबर 2019 मध्ये उपमुख्यमंत्री होते.
30 नोव्हेंबर 2019 ला उद्धव ठाकरेंच्या सरकार मध्ये अजित पवार 29 जून 2023 पर्यंत उपमुख्यमंत्री होते.
एनसीपी मध्ये फूट पडल्यानंतर महायुतीत सहभागी झालेले अजित पवार 2 जुलै 2023 ते 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत उपमुख्यमंत्री होते.
आता सहाव्यांदा पुन्हा देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची आमंत्रण पत्रिका सोशल मीडीयामध्ये वायरल; Devendra Fadnavis यांच्या नावात पहिल्यांदाच आईच्या नावाचा उल्लेख .
अजित पवार हे आपल्या चोख कामासाठी, शिस्तीसाठी आणि कार्याभिमुख प्रशासक म्हणून ओळखले जातात. अजित पवार 1991 साली पहिल्यांदा बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर खासदारकीचा राजीनामा देऊन