Ajit Pawar Tested COVID19 Positove: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हलक्या स्वरुपातील ताप येत असल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. अजित पवार यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झाले आहेत. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन असे अजित पवार यांनी म्हटले आहे.(Medical Officers Honorarium: आदिवासी भागात वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या मानसेवी अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ; वेतन 24 हजारांवरुन 40 हजार झाल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती)
अजित पवार यांनी त्यांची कोरोनाची चाचणी बद्दल माहिती ट्विटरवरुन दिली होती. त्यात त्यांनी असे म्हटले होते की, काही अपरिहार्य कारणांमुळे मुंबईतील कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी उपलब्ध नसणार आहे. परंतु उपमुख्यमंत्री फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकांना उपस्थितीत राहतील.(Ajit Pawar on Eknath Khadse: भाजप नेते एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश? अजित पवार काय म्हणाले पाहा)
Tweet:
राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचं काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत पुन्हा कार्यरत होईन.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 26, 2020
Tweet:
Maharashtra Deputy CM Ajit Pawar (File pic) tests positive for #COVID19, he is admitted to a hospital in Mumbai: Office of Deputy CM pic.twitter.com/salHeIHTUW
— ANI (@ANI) October 26, 2020
दरम्यान, अजित पवार यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील सोलापूर येथे तीन दिवसांसाठी दौरा केला होता. परंतु तेथून परतल्यानंतर अजित पवार यांना पुन्हा एकदा थकवा जाणवण्यासह प्रकृती सुद्धा बिघडली. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी क्वारंटाइन राहण्याचे ठरवले होते.
तर महाराष्ट्र राज्यात काल 6059 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन 5648 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले. त्यामुळे एकूण 1460755 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देत घरी पाठविण्यात आले. तर राज्यात एकूण 140486 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.8% झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.