Medical Officers Honorarium: आदिवासी भागात वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या मानसेवी अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ; वेतन 24 हजारांवरुन 40 हजार झाल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

कोरोना विषाणू (Coronavirus) काळात राज्यातील आर्थिक बाबी पुन्हा रुळावर आणण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. अशात आज 12,500 पोलिसांची भरती होणार असल्याची घोषणा करण्यात आली.

Medical Officers Honorarium: आदिवासी भागात वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या मानसेवी अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ; वेतन 24 हजारांवरुन 40 हजार झाल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
Deputy Chief Minister Ajit Pawar | (Photo Credits : Facebook)

कोरोना विषाणू (Coronavirus) काळात राज्यातील आर्थिक बाबी पुन्हा रुळावर आणण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. अशात आज 12,500 पोलिसांची भरती होणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता राज्यातील दुर्गम-अतिदुर्गम आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी भागात ‘नवसंजीवनी’ योजनेंतर्गत गरोदर माता, स्तनदा माता, तसेच शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पाड्यांवर जाऊन वैद्यकीय सेवा आणि उपचार देणाऱ्या मानसेवी (Manasevi) वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन 24,000 हजारांवरुन थेट 40,000 रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी आज घेतला.

‘मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यां’च्या प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक पार पाडली. राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी भागात ‘नवसंजीवनी’ योजनेंतर्गत मानसेवी वैद्यकीय अधिकारी कार्यक्षेत्रात जाऊन सेवा देतात, तसेच आश्रमशाळेत तपासणीचे काम करतात. हे मानसेवी वैद्यकीय अधिकारी अतिदुर्गम आणि संवेदनशील भागतील साधारण सहा ते दहा गावांना सेवा देतात. या दौऱ्यात ते बाह्य रुग्ण तपासणी, गरोदर माता, स्तनदा माता व कुपोषित बालकांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करतात. त्याचबरोबर त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राना इतर राष्ट्रीय कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणीसाठी मदत करत असतात. मानसेवी आरोग्य अधिकारी हे पद कंत्राटी स्वरूपाचे असल्याने त्यांना इतर लाभ मिळत नाहीत. (हेही वाचा: महाराष्ट्रात होणार तब्बल 12,500 पोलिसांची भरती; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती)

सध्याच्या परिस्थितीत आरोग्यसेवेसाठी डॉक्टर, परिचारिका इतर आरोग्य विभागाचे कर्मचारी बहुमोल योगदान देत आहेत. मानसेवी वैद्यकीय अधिकारीही दुर्गम आदिवासी भागत आरोग्य सेवेसाठी तत्पर आहेत. त्यामुळे त्यांचे मानधनात चोवीस हजारांवरून थेट चाळीस हजार रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. या निर्णयाचा लाभ राज्यातील दुर्गम, संवेदनशील भागात आरोग्य सेवा देण्याचे काम करणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांना होणार आहे.

राज्यातील आरोग्य विभागासाठी आवश्यक ती सर्व मदत देण्यासाठी सरकार तत्पर आहे, मात्र रुग्णांची सेवा करताना हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या कडक सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

(The above story first appeared on LatestLY on Sep 16, 2020 11:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).