Ajit Pawar on Eknath Khadse | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)Chhatrapati

जेष्ठ भाजप (BJP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) नाराज असून लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करतील असे वृत्त गेल्या प्रदीर्घ काळापासून प्रसारमाध्यमांध्ये सुरु आहे. या वृत्तावर राज्याचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी म्हटले आहे की, 'राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. या भेटी झाल्या याचा अर्थ त्यामागे काही काळंबेरं अहे असं समजण्याचे कारण नाही'. एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाच्या वृत्ताबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

पुणे येथील विधान भवन येथे अजित पवार यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलेे. या वेळी अजित पवार बोलत होते. या वेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, राजकारणात भेटी गाठी होत असतात. या आधी भाजपची सत्ता असतानाही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून अनेकदा भाजप नेत्यांना भेटत असू. तुम्ही मला गेली कित्येक वर्षे ओळखताच, असेही अजित पवार या वेळी म्हणाले. एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत मला मला फारसे माहिती नाही. जेवढे माहिती आहे तेवढे तुम्हाला सांगितले आहे, अशी गुगलीही अजित पवार यांनी या वेळी टाकली.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी आपल्या कार्यकर्त्यांची मुक्ताईनगर येथे नुकतीच एक बैठक घेतली. यात पुढील निर्णय काय घ्यायचा यावर विचारविमर्श झाल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसे यांनी आपण भाजप सोडणार नसल्याचे म्हटले असले तरी त्यांच्या पक्षांतराबाबतची चर्चा मात्र अद्याप कायम आहे. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही याबाबत मैन बाळगले आहे. त्यामुळे या प्रकरणातला सस्पेन्स अधिकच वाढला आहे. (हेही वाचा, Eknath Khadse Likely to Leave BJP: एकनाथ खडसे सोडणार कमळाची साथ? पण भाजप सोडून जाणार कोठे? राष्ट्रवादी काँग्रेस की शिवसेना?)

एकनाथ खडसे यांनी पक्षातील आपली नाराजी या आधी अनेकदा बोलून दाखवली आहे. त्यांनी एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव घेऊन अनेकदा उघड टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात शाब्दिक युद्धही काही काळ रंगले होते. या सर्व घटना घडामोडी पाहता खडसे हे भाजपमध्ये नाराज असल्याचे लपून राहिले नाही.