Maharashtra Congress (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्र कॉंग्रेसने राज्यातील विधानसभा निवडणूका 2019 साठी तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये अक्कलकोट मधून सिद्धराम म्हेत्रे, मुंबई शहरातील वडाळा विधानसभा मतदार संघातून शिवकुमार लाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या या यादीमध्ये 20 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. आत्तापर्यंत कॉंग्रेसने आगामी विधानसभा निवडणूकांसाठी 123 जणांची यादी जाहीर केली आहे यापूर्वी घटस्थापनेच्या मुहूर्तावर कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर केली होती. काही दिवसांपूर्वी सिद्धराम म्हेत्रे नाराज असून ते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. तर कालिदास कोळंबकर यांनी कॉंग्रेसला रामराम केल्यानंतर आता त्यांच्याजागी वडाळा विधानसभा मतदारसंघातून शिवकुमार लाड  यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबत कॉंग्रेसने आघाडी जाहीर केली आहे. राज्यात दोन्ही पक्ष प्रत्येकी 125 जागा लढवणार आहेत. तर मित्र पक्षांसाठी 38 जागा सोडण्यात आल्या आहेत.

कॉंग्रेस पक्षाची तिसरी उमेदवार यादी

१. नंदुरबार - मोहन सिंग

२. शिरपूर - रणजीत पावरा

३. नागपूर पूर्व - पुरुषोत्तम हजारे

४. नागपूर मध्य - ऋषीकेश शेळके

५. अहेरी - दीपक अत्राम

६. परभणी - रवीराज देशमुख

७. सिल्लोड - प्रभाकर पलोडकर

८. औरंगाबाद पश्चिम - रमेश गायकवाड

९. नाशिक मध्य - शाहू खैरे

१०. मालाड पश्चिम - असलम शेख

११. घाटकोपर पश्चिम - मनिषा सुर्यवंशी

१२. कलिना - जॉर्ज अब्राहम

१३. वांद्रे पश्चिम - असिफ जकेरिया

१४. वडाळा - शिवकुमार लाड

१५. भायखळा - मधुकर चव्हाण

१६. अलिबाग - श्रद्धा ठाकूर

१७. अक्कलकोट - सिद्धाराम म्हेत्रे

१८. पंढरपूर - शिवाजीराव काळुंगे

१९. कुडाळ - हेमंत कुडाळकर

२०. कोल्हापूर उत्तर - चंद्रकांत जाधव

महाराष्ट्रात 288 जागांसाठी विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. 21 ऑक्टोबर दिवशी मतदान तर 24 ऑक्टोबर दिवशी मतदानाचा निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदा दिवाळीपूर्वीच राजकीय फटाके फुटणार आहेत.