Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Maharashtra Congress First Candidates' List: घटस्थापनेच्या मुहुर्तावर आज महाराष्ट्र कॉंग्रेस पक्षाने पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये 51 उमेदवारांची नावं आहे. कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) , अशोक चव्हाण (Ashik Chavan), विजय वडेट्टीवार (Vijay Namdevrao Wadettiwar), वर्षा गायकवाड (Varsha Eknath Gaikwad) यांच्यासह दिग्गज राजकारणांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी 288 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष यांची आघाडी प्रत्येकी 125 जागांवर निवडणूकीच्या मैदानात आपले उमेदवार उतरवणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. तर 38 जागा या इतर पक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत.  यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाची पहिली यादी शरद पवार यांनी बीड मध्ये जाहीर केली होती.

महाराष्ट्रात राष्ट्र्वादी आणि कॉंग्रेस पक्ष एकत्र लढणार असली तरीही काही जागांवर या पक्षांमध्ये अद्याप चर्चा सुरू आहे. मात्र कॉंग्रेस पक्षाच्या वर्षानुवर्ष असलेल्या 51 जागांसाठी पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आहे. Maharashtra Assembly Elections 2019: काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूकीसाठी विभाग प्रभारींची यादी जाहीर

महाराष्ट्र कॉंग्रेसची विधानसभा निवडणूकीसाठी पहिली यादी

  1. अक्कलकुवा - के.सी पडवी
  2. शहादा - पदमाकर विजयसिंग वालवी
  3. नवापूर - शिरिष नाईक
  4. रावेर - शिरिष चौधरी
  5. बुलडाणा - हर्षवर्धन सकपाळ
  6. मेहकर- अनंत वानखेडे
  7. रिसोड - अमित जनक
  8. धामनगाव - विरेंद्र जगताप
  9. तिवसा - यशोमती ठाकूर
  10. आर्वी - अमर शरद काळे
  11. देवळी- रंजीत प्रताप कांबळे
  12. सावनेर- सुनील छत्रपाल केदार
  13. नागपूर (उत्तर)- डॉ. नितीन राऊत
  14. ब्रह्मपुरी- विजय नामदेवराव वडेट्टीवार
  15. चिमुर- सतीश मनोहर वर्जुराकर
  16. वरोरा- प्रतिभा सुरेश धानोरकर
  17. यवतमाळ- अनिल बाळासाहेब मांग्रुळकर
  18. भोकर- अशोकराव शंकरराव चव्हाण
  19. नांदेड (उत्तर)- डी.पी. सावंत
  20. नायगाव- वसंतराव बळवंतराव चव्हाण
  21. देगलूर- रावसाहेब जयवंत अनंतपुरकर
  22. काळमनुरी- संतोष कौतिका तर्फे
  23. पाथरी- सुरेश अंबादास वारपुडकर
  24. फुलंब्री- डॉ. कल्याण वैजंथराव काळे
  25. मालेगाव (मध्य)- शैख असिफ शैख राशिद
  26. अंबरनाथ- रोहित चंद्रकात साळवे
  27. मिरा भाईंदर- सय्यद मुझफ्फर हुसेन
  28. भांडूप (पश्चिम)- सुरेश हरिशचंद्र कोपरकर
  29. अंधेरी (पश्चिम)- अशोकभाऊ जाधव
  30. चांदिवली- मोहम्मद आरिफ नसीम खान
  31. चेंबूर- चंद्रकात दामोदर हंदोरे
  32. वांद्रे (पूर्व)- जिशान जियाउद्दीन सिध्दीकी
  33. धारावी- वर्षा एकनाथ गायकवाड
  34. सायन कोळीवाडा- गणेश कुमार यादव
  35. मुंबादेवी- अमिन अमीराली पटेल
  36. कोलाबा- अशोक अर्जुनराव जगताप
  37. महाड- माणिक मोतिराम जगताप
  38. पुरंदर- संजय चंद्रकांत जगताप
  39. भोर- संग्राम अनंतराव तोपते
  40. पुणे- रमेश अनंतराव बागवे
  41. संगमनेर- विजय बाळासाहेब थोरात
  42. लातुर (शहर)- अमित विलासराव देशमुख
  43. निलंगा- अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर
  44. औसा- बासवराज माधवराव पाटील
  45. तुळजापूर- मधुकरराव देवराम चव्हाण
  46. सोलापूर शहर (मध्य)- प्रणिती सुशील कुमार शिंदे
  47. सोलापूर (दक्षिण)- मौलबी बाशुमिया सयीद
  48. कोल्हापूर (दक्षिण)- ऋतुराज संजय पाटील
  49. कारवीर- पी.एन.पाटील सादोळीकर
  50. पळुस-कडेगाव- डॉ. विश्वजीत पतंगराव कदम

4 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची वेळ आहे. त्या पार्श्वभूमीवर आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेचा मुहुर्त साधत कॉंगेसने पहिली यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात यंदा 21 ऑक्टोबरला निवडणूकीसाठी मतदान तर 24 ऑक्टोबर दिवशी मतमोजणी होणार आहे. यंदा मतदार कुणाच्या बाजुने आपला कौल देते हे पाहणं उत्सुकतेचे झाले आहे.