File image of devotees immersing the Ganesha idol | (Photo Credits: PTI)

यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईच्या अनेक सार्वजनिक मंडाळाचे गणपती आता त्यांच्या मंडपाकडे निघले असल्याने आगमन सोहळ्यांच्या मिरवणूकांनी मुंबई दणदणत आहे. मात्र यंदा गणेशोत्सवाच्या काळात तसेच मिरवणूक कार्यक्रमांमध्ये मुंबईतील कामजोर झालेल्या पुलांवर नाचणं गणेशभक्तांनी टाळावं असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुंबईत स्ट्रक्चरल ऑडिट दरम्यान अनेक पूल धोकादायक असल्याचं समोर आलं होतं. भविष्यात पूल अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीतून हा निर्णय घेतला असावा असं सांगण्यात आलं आहे.

मुंबई सह महाराष्ट्रामध्ये येत्या 2 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे 2 ते 12 सप्टेंबर दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काल (14 ऑगस्ट) मुंबईत महत्त्वाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. Ganeshotsav 2019: मंडळांना ऑनलाईन परवानगी घेण्याची सुविधा, 19 ऑगस्ट पर्यंत 'या' संकेतस्थळावर करता येणार अर्ज

गणेशोत्सवाच्या काळात रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी देण्यासाठी सरकार विचार करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सुरक्षेच्या दृष्टीनेही काही महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळार 2,6,7 आणि 12 सप्टेंबर दिवशी ध्वनिवर्धक रात्री 12 वाजेपर्यंत वाजवण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. 12 सप्टेंबर दिवशी अनंत चतुर्दशी असल्याने या दिवशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या भव्य मिरवणूका निघतात.