गणेशोत्सव काळात रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी मिळण्याची शक्यता- देवेंद्र फडणवीस
Ganpati Festival (Photo Credits-Facebook)

गणेशोत्सवाची (Ganpati Festival) लगभग सध्या सुरु झाली आहे. अवघ्या काही दिवसांवर गणपतीचे आगमन होणार असून त्यासाठी गणेश मंडळांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एका बैठकीत गणेशोत्सव काळात राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला विनोद तावडे, आशिष शेलार आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह अन्य नेते आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती.

या बैठकीदरम्यान गणेशोत्सवाचा आनंद कायम राहिला पाहिजेच. मात्र हा उत्साह शांततेत साजरा व्हावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्याचसोत कायदा सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ते नियोजन गणेशोत्सवावेळी करण्यात येणार आहे. तर पारंपरिक वाद्यांना परवानगी देण्यासंदर्भात पोलिसांनी योग्य ती भुमिका घ्यावी असे सुद्धा त्यांना बजावण्यात आले आहे. मात्र गणेशोत्सव काळात जास्तीत जास्त दिवस रात्र 12 वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना (Sound Enhancer) परवानगी मिळण्याची शक्यता देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवली आहे.(दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पाच हजार शहाळ्याची आरास!)

तसेच पोलिसांनी गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीवेळी वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, धर्मादाय संस्था, विश्वस्त मंडळ नोंदणीसाठी अत्याधुनिक प्रणाली सुरु करण्यात येणार आहे. ही कार्यप्रणाली ऑनलाईन पद्धतीने असणार असून महापालिकेच्या कार्यालयाह हेलपाटे घालण्याता वेळ वाचणार आहे.