अहमदनगर: पाणीपुरीच्या ठेल्यावरील पाण्यात सापडल्या जिवंत अळ्या
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : pixabay)

अहमदनगर (Ahamadnagar) येथे एका पाणीपुरीच्या ठेल्यावरील पाण्यात जिवंत अळ्या सापडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारानंतर अशा प्रकारचे खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. या प्रकारानंतर सदर पाणीपुरीव्याला विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

नेप्ती नाका चौक येथे हा प्रकार घडला आहे. काहीजण येथे असलेल्या एका पाणीपुरीवाल्याकडे खाण्यासाठी गेले असता त्याच्या पाण्यात जिवंत अळ्या असल्याचे दिसले. ही बाब तरुणांनी विक्रेत्याच्या लक्षात आणून दिली असता त्याने तेथून पळ काढला. याबद्दल विक्रेत्याने माफी मागितली आणि पाणीपुरीचे हे पाणी तीन दिवसांपूर्वीचे असल्याचे कबुल केले.(प्लास्टिकचा पाऊस पडतोय? वैज्ञानिकांनी केला धक्कादायक खुलासा)

 या अशा प्रकारामुळे स्वच्छतेची काळजी न घेता नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. तसेच महानरपालिका आणि अन्न-औषध या विभागाने रस्त्यावर विक्री केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थ्यांची तपासणी करावी असे सुद्धा म्हटले जात आहे.