Drink and Drive: पाणीपुरी खाणाऱ्या 3 बहिणींना भरधाव कारची धडक, 1 ठार, 2 जखमी; मद्यधूंद चालकामुळे अपघात
Accident | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

पाणीपुरी (Panipuri) खात असलेल्या 3 बहिणींना भरधाव कारने धडक दिली. या धडकेत एक जागीच ठार झाली तर इतर दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. मृत मुलगी केवळ 6 वर्षांची आहे. मद्यधुंद असलेल्या कारचालकाच्या (Drink and Drive) चुकीमुळे हा अपघात (Noida Accident) घडला. चालकाचे आपल्या मारुती डिझायर (Maruti Dzire) वरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. ही घटना नोएडा (Noida) येथील सेक्टर-45 मधील सदरपूर गावात घडली.

अपघात घडला तेव्हा रिया, अनु आणि अंकिता या तीन बहिणी पाणीपुरी खात होत्या. दरम्यान, एक भरधाव कार आली आणि कारने या तिघींना धडक दिली. अपघातामध्ये तिघीही गंभीर जखमी झाल्या. तिघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी 6 वर्षाच्या रियाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) राजीव बल्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना यांनी सांगितले. (हेही वाचा, Delhi-Gurugram Expressway Accident: दिल्ली-गुरुग्राम एक्स्प्रेस वेवर BMW ने दिली सायकलला धडक; सायकलस्वाराचा मृत्यू)

दरम्यान, उपचार घेत असलेली अनु (वय वर्षे15) हिच्या मणक्याला दुखापत झाली आहे. तर अंकिता (वय वर्षे 18) हिला किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडितांची आई शेजारीच उभी होती. कारच्या धडकेपासून ती थोडक्यात बचावली. कारमधील 4 प्रवाशांसह ही कार विटांच्या खांबावर आदळली. धडक इतकी जोरदार होती की, पाणीपुरी विक्रेत्याचा गाडाही धडकेमुळे उलटला.

घटनास्थळी जमलेल्या जमावाने चालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी चालकाला अटक केली असून, कार जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.