Delhi-Gurugram Expressway Accident: दिल्ली-गुरुग्राम एक्स्प्रेस वेवर BMW ने दिली सायकलला धडक; सायकलस्वाराचा मृत्यू
Delhi-Gurugram Expressway Accident (PC- Twitter/ANI)

Delhi-Gurugram Expressway Accident: दिल्ली-गुरुग्राम एक्स्प्रेस वे (Delhi-Gurugram Expressway) वर वसंत कुंज परिसरात रविवारी एक मोठा वेदनादायक अपघात (Accident) झाला. दिल्ली-गुरुग्राम एक्स्प्रेस वेवर बीएमडब्ल्यू कारच्या (BMW Car) धडकेत सायकलस्वार ठार झाला. अपघातानंतर लगेचच सायकलस्वाराला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून बीएमडब्ल्यू कारच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना बीएमडब्ल्यू कारचे टायर फुटलेले आणि विंडशील्डचा चक्काचूर झालेला दिसला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने आणि सायकलस्वाराला धडक दिली. (हेही वाचा -Indian Student killed in Accident At Canada: कॅनडामध्ये ट्रकने सायकलला धडक दिल्याने भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू)

शुभेंदू चॅटर्जी (वय, 50) असे मृत सायकलस्वाराचे नाव आहे. शुभेंदू चॅटर्जी हे हरियाणातील गुरुग्रामचे रहिवासी होते. घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ज्या बीएमडब्ल्यू कारमध्ये हा अपघात झाला, त्यावर राष्ट्रपतींच्या वित्त समितीचे स्टिकर होते. बीएमडब्ल्यू कारच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले असून धडकेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. (हेही वाचा - Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर बोर घाटात भीषण अपघात, 5 ठार 2 जखमी)

शुभेंदू चॅटर्जी हे हरियाणातील गुरुग्रामचा रहिवासी होते. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांनी वसंत कुंज उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आता हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास केला जाणार आहे. पोलीस तेथे उपस्थित सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहेत.