Indian Student killed in Accident At Canada: कॅनडामध्ये ट्रकने सायकलला धडक दिल्याने भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
Road Accidents | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Indian Student killed in Accident At Canada: कॅनडामध्ये (Canada) एका भारतीय विद्यार्थ्याचा (Indian Student) रस्ते अपघातात (Accident) मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिक सैनी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक हा त्याच्या सायकलने रस्ता ओलांडत असताना समोरून जाणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिली.

पोलिसांनी सांगितले की, फोर्ड एफ-250 पिकअपच्या चालकाने सायकलस्वाराला धडक दिली आणि त्याला यंग स्ट्रीटवर ओढून नेले. अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सैनी यांना जागीच मृत घोषित केले. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. सैनी यांचा मृतदेह लवकरात लवकर भारतात पाठवण्याची विनंती कुटुंबीयांनी केली आहे. (हेही वाचा -  Kashedi Ghat Road Accident: कशेडी घाटात रिक्षा-डंपर यांच्यामध्ये धडक; 4 जणांचा मृत्यू)

रिपोर्टनुसार, शेरीडन कॉलेजने पुष्टी केली आहे की कार्तिक त्यांचा विद्यार्थी होता. या घटनेनंतर कॉलेजने ईमेलद्वारे निवेदन जारी केले. कॉलेजने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कार्तिकच्या मृत्यूने आम्हा सर्वांना खूप धक्का बसला आहे. आम्ही पीडित तरुणाच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. (हेही वाचा - Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर बोर घाटात भीषण अपघात, 5 ठार 2 जखमी)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना योंगे स्ट्रीट आणि सेंट क्लेअर अव्हेन्यू दरम्यान घडली. आतापर्यंतच्या तपासानुसार हा अपघात बुधवारी सायंकाळी 4.30 वाजता झाला. ट्रकच्या धडकेतच दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.