पुणे: प्रेमभंगामुळ प्रियकर बिथरला, प्रेयसीच्या वसतिगृहात गोळीबार करत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन ठोकली उडी
After the Break Up Boyfriend collage-Girlfriend | (Photo credit: archived, edited and Symbolic images)

प्रेमभंग (Break Up) झाल्याचा झटका पुणे (Pune) येथील एका प्रेमवीराला काहीसा अधिकच बसला. या झटक्यामुळे प्रियकर (Boyfriend ) पुरता विस्कटून गेला. मग बिथरलेल्या या प्रेमविराने भलताच प्रताप केला. तो थेट प्रेयसीच्या वसतिगृहात ( Ex Girlfriend's hostel ) गेला आणि तिथे त्याने चक्क हवेत गोळीबार केला. इतका सगळा तमाशा केल्यावरही तो स्वस्त बसला नाही. त्याने वसतिगृह इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील प्रेयसीच्या खोलीत प्रवेश केला आणि तिथून खाली जमीनीवर उडी ठोकली.

बाणेर येथील 23 वर्षीय प्रियकराने हा प्रताप केल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहितीनुसार त्याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, त्यांच्यातील नाते फार काळ टिकू शकले नाही. त्यामुळे प्रेमभंगाच्या दुख:ने तो पुरता सैरभैर झाला होता. दरम्यान, त्याचे तरुणीसोबत प्रेमसंबध नव्हते तर, एकतर्फी प्रेम होते अशीही परिसरात चर्चा आहे. (हेही वाचा, मिठीतल्या प्रेयसीचे चुंबन कॅमेऱ्यात कैद; प्रियकराला ४ वर्षांची शिक्षा)

दरम्यान, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत स्टंट या तरुणाला चांगलाच महागात पडला. या प्रकारात त्याला चांगलाच मार लागला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, चतुश्रुंगी पोलिसांनी घटनेची नोंद गेत तपास सुरु केला आहे.