महाराष्ट्रात विधानसभा निवडूकीचे निकाल लागल्यानंतर ते आतापर्यंत सत्ता स्थापन झाली नाही. तर भाजप-शिवसेना पक्षातील वाद हा अद्याप कायम असून मुख्यमंत्री कोणाचा यापेक्षा आता राष्ट्रपती राजवट लागू होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 9 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाल संपणार आहे. तत्पूर्वी आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवल्यानंतर एका पत्रकार परिषद घेतली. तर पत्रकार परिषदेत सर्वप्रथम त्यांनी जनतेने दिलेल्या पाठिंब्यामुळे सर्वकाही करणे शक्य झाल्याचे म्हणत आभार मानले.
तसेच पदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटरवरुन त्यांचे मुख्यमंत्री पद हटवले आहे. त्याजागी त्यांनी आता काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पद लिहिले आहे. त्याचसोबत फडणवीस यांनी ट्वीटरवरील त्यांच्या अकाउंटचा कव्हर फोटो बदलला असून त्यामध्ये धन्यवाद महाराष्ट्र म्हणून नमूद केले आहे.(देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात सत्ता स्थापनाठी 'हे' दोन पर्याय)
तर गेली 5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात जनेतच्या हितासाठी विविध कामे पार पाडली असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. एवढेच नाही त्यांनी शिवसेना पक्षाचे सुद्धा आभार मानत युतीने बहुमताचा आकडा गाठल्याने त्यांचे ही कौतुक केले. पण आता शिवसेनेने निवडणूकीच्या निकालानंतर ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पदासाठी मागणी केली आहे आणि त्यासाठी जी विधाने भाजप विरोधात विधाने केली त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र फडणवीस यांच्या आजच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या चेहऱ्यावर एक नाराजी आणि सत्ता स्थापन न झाल्याची खंत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. मात्र तमाम जनतेसह पत्रकार, विरोधी पक्षांचे सुद्धा आभार मानले आहेत.