Divorce | Pixabay.com

आजकाल लग्न हा सोहळा झाला असल्याने वधू- वर दोन्ही पक्षाकडून त्यांच्या आयुष्यातील या टप्प्याचे सारे क्षण टिपण्यावर मोठा खर्च करतात. लग्ना आधी प्रिवेडिंग फोटोग्राफीचं देखील आकर्षण आहे. या सार्‍यानंतर लग्न आयुष्यभर टिकेल याची कोणतीच खातरजमा नसते. एका मुलीने तिच्या लग्नानंतर 4 वर्षात विभक्त झाल्यानंतर आपल्या लग्नाच्या फोटोग्राफीवर केलेला खर्च फोटोग्राफर कडून परत मागितला आहे. सोशल मीडीयामध्ये फोटोग्राफर आणि त्या मुलीचा व्हॉट्सअ‍ॅप चॅट वायरल होत आहे.

दरम्यान फोटोग्राफरने चॅट सोशल मीडीयामध्ये शेअर केले आहे. सुरूवातीला फोटोग्राफरला देखील हे चॅट प्रॅन्क असल्याचं वाटलं पण नंतर त्याला ती खरंच या विषयाला घेऊन गंभीर असल्याचं समोर आलं. Man Kilss Entire Family: पत्नीने घटस्फोट मागितल्यावर पतीने संपूर्ण कुटुंबच संपवले; बायको, 5 मुले आणि सासूवर गोळी झाडून स्वतः केली आत्महत्या.

पहा वायरल व्हॉट्सअ‍ॅप चॅट

घटस्फोट झालेल्या महिलेने फोटोग्राफरला सांगितले की तिचे लग्न अपेक्षेप्रमाणे झाले नाही म्हणून तिला 'रिफंड' मिळावा. छायाचित्रकाराने पैसे परत देण्यास नकार दिल्याने महिलेने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकीही दिली. त्याने सांगितले की महिलेच्या घटस्फोटित पतीने त्याच्याशी संपर्क साधला आणि तिच्या वागण्याबद्दल माफी मागितली.

दरम्यान ही घटना साऊथ आफ्रिका देशातील असून Lance Romeo असं फोटोग्राफरचं नाव आहे.  त्याने  व्हॉट्सअ‍ॅप चॅट सोशल मीडीयात शेअर करत या प्रकार प्रकाशझोकात आणला.