बैलाने विद्यार्थ्यावर केलेल्या हल्ल्यानंतर IIT-Bombay कॅम्पस मध्ये उभारणार गोशाळा?
Gaushala (Photo Credits: IANS)

काही दिवसापूर्वी मुंबईच्या IIT कॅम्पसमध्ये (IIT Bombay Campus) एक 21 वर्षीय विद्यार्थ्यावर बैलाने केलेल्या अनपेक्षित हल्ल्यानंतर या या कॅम्पस परिसरात गोशाळा उभारण्याचा विचार IIT व्यवस्थापन करत आहे. त्यासाठी आयआयटी च्या व्यवस्थापन मंडळाने कॅम्पस परिसरात योग्य अशी जागा पाहण्यास देखील सुरुवात केली आहे.

विद्यार्थ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सोमवारी पवई परिसरातील गुरांना नेण्यासाठी मुंबई महापालिकेची गाडी आली होती. मात्र येथील रहिवाशांनी त्यांना विरोध केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

या दुर्घटनेविषयी बोलायचे झाले तर, पीडित अक्षय पी.एल मोबाईलमध्ये बघत उभा होता. अचानक आलेल्या दोन बैलांनी त्याला काही कळायच्या आत धडक दिली. त्यानंतर अक्षय जमिनीवर कोसळला. इतर विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रथम त्याला आयआयटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर विक्रोळी येथील सुशुश्रा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

हेही वाचा- IIT Bombay मधील 21 वर्षीय विद्यार्थ्यावर बैलांचा हल्ला

अक्षयची प्रकृती स्थिर असून त्याच्या पोटाच्या आत कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.