शिवसेना (Shiv Sena) बंडखोर आमदारांवर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आक्रमक शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. मुंबईतील एका शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते. आज गुवाहाटी येथे बसून जे लोक सांगत आहेत आम्हाला निधी मिळाला नाही. भेट मिळाली नाही. त्यांना माझे उघड आव्हान आहे. या आणि माझ्यासमोर विधानसभेत बसा. तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्यासमोरही बसण्याची आवश्यकता नाही. आम्ही तुम्हाला काहीही करणार नाही. हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेऊ. फक्त तेव्हा तुम्ही माझ्यासी डोळ्यात डोळे घालून बोला? मी तुम्हाला फक्त इतकेच विचारने तुम्हाला आम्ही काय कमी केले? तुम्ही कोणाच्या नावावर निवडून आले आहात?असा सवालच आदित्य ठाकरे यांनी विचारला.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे. शिवसेनेतील हे बंड मोडून काढण्यासाठी किंवा थोपविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि एकून ठाकरे कुटुंबीयांसह उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय कामाला लागले आहेत. शिवसेनेच्या अतिशय वरिष्ठ नेत्यांनी शिवसैनिकांचे विभागवार मेळावे घेण्यास सुरुवात केली. अशाच एका मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर तीव्र शब्दांमध्ये टीका केली. आदित्य ठाकरे यांनी मेलाव्यांमधून आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांना माझी विचारणा आहे की, तुम्हाला शिवसेनेत असे काय कमी केले होते? जे एकनाथ शिंदे हे या बंडखोरांचे नेतृत्व करत आहे त्याच एकनाथ शिंदे यांना स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारले होते मुख्यमंत्री पद हवे आहे काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 20 मे रोजी हे विचाले त्यावेळी शिंदे यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर लगेच पुढे 20 जूनला बंड झाले. आता झाले ते बस्स झालं. या पुढे बंडखोरांना विधानभवनाची पायरी चडू द्यायची नाही. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर मविआ सक्रीय, शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक, डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरु)
ज्यांना जायचे आहे त्यांना जाऊ द्या. आपण शिवसैनिक मिळून पुन्हा नवी शिवसेना उभी करु. कोणी काहीही करु देत. शिवसेना, शिवसेनेचा धनुष्यबाण हा आपल्याकडेच राहणार. असममध्ये पाहा महापूर आला आहे. खरे तर तिथल्या लोकांना मदत करण्याची आवश्यकता आहे. असे असतना हे लोक तिथे जाऊन हॉलेलमध्ये राहात आहेत. तुम्ही महाराष्ट्रातून पळाला तेव्हाच कळले तुमची बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याची लायकीच नाही. जर तुम्ही खरोखरच बाळासाहेबांचे शिवसैनिक असता आणि तुमच्या थोडा जरी स्वाभीमान असता तर तुम्ही सूरतला पळाला नसता. महाराष्ट्रात लपण्याची हिंमत नसल्यानेच तुम्ही सूरतला पळाला आहात, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.