Mumbai Pune Express Highway Accident: पंढपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसाचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर झाला आहे. बस डोंबिवलीवरून पंढपूरला जात होती. या भीषण (Accident) अपघातात 5 भाविकांचा मृत्यू झाला. तर आठ जण गंभीर जखमी झाले. या मध्ये 54 वारकरी प्रवास करत होते. इतर प्रवाशांना देखील किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघातानंतर अनेक भाविक हळहळ व्यक्त करत आहे. (हेही वाचा- भोर एसटी स्थानकात तरुणाचा अपघाती मृत्यू, धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद
विठ्ठलाचा दर्शनासाठी आणि आषाढी एकादशीचा सण साजरा करण्यासाठी ठिकठिणाहून भाविक पंढरीला जात असतात. पंढपूरला जात असताना एका भाविकांच्या बसचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, बसमधील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. रात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला. बस चालकाचा बसवरील नियंत्रण सुटलं. अनियंत्रित बस पुढे जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, यात बस पुढे जाऊन खड्ड्यात पडली.
पाहा व्हिडिओ
Experss Way Accident | पंढरपूरला जाणाऱ्या बसचा अपघात, 5 वारकऱ्यांचा मृत्यू, 30 जण जखमी ABP Majha#pandharpur @mieknathshinde @Dev_Fadnavis #wari2024 #MumbaiNews pic.twitter.com/8O0aaP2lfA
— ABP माझा (@abpmajhatv) July 16, 2024
या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ प्रतिसाद देत जखमींना बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे. हा अपघात कसा झाला याचे नेमके कारण पोलिस शोधत आहे. पोलिस मृतांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देत आहे.