Samruddhi Highway Accident: गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे. शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला. मुंबईहून बिहारमधील छाप्राकडे निघालेल्या कारला समृद्धी महामार्गावर वैजापुरजवळ जांबरगाव ते लासुरगावदरम्यान भीषण अपघात झाला. हज यात्रेला जाण्यासाठी कुटुंब गावाकडे जात होते. या अपघातात एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला असून कुटुंबातील अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अख्तर रझा (वय 1 वर्षे) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, अपघातग्रस्त कुटुंब हे मूळचे बिहारमधील येथील असून सध्या ते नवी मुंबईमध्ये स्थायिक झाले आहे. खान कुटुंबिय गया येथून 17 जून रोजी ते विमानाने हज यात्रेसाठी जाणार होते. त्यामुळे ते बिहारमधील आपल्या गावी निघाले होते. दरम्यान, समृद्धी महामार्गावरुन जात असताना जांबरगाव व लासूरगाव दरम्यान त्यांच्या कारचा अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या कॉरिडॉरजवळच्या उलटली. (हेही वाचा - VIDEO: रेल्वे रूळ ओलांडताना एक व्यक्ती थोडक्यात बचावला, Video मध्ये पहा RPF जवानाने कसे वाचवले त्याचे प्राण)
तथापी, या भीषण अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातात आझाद अली खान (वय 49 वर्षे), अफताब अली (वय 24 वर्षे), खुशबू आलम खान (वय 26 वर्षे) यास्मिन खान (वय 18 वर्षे), सोहेल आलम खान (वय 30 वर्षे) हे गंभीर जखमी झाले. जखमींना नागरिकांनी तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, नंतर त्यांनी पुढील उपचारासाठी येवला येथे हलवण्यात आहे.
समृद्धी महामार्ग वाहतुकिसाठी खुला केल्यानंतर या महामार्गावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत या महामार्गावर 358 अपघात घडले असून, यात 39 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.