VIDEO: रेल्वे रूळ ओलांडताना एक व्यक्ती थोडक्यात बचावला, Video मध्ये पहा RPF जवानाने कसे वाचवले त्याचे प्राण

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये अनेक लोक आरपीएफ जवानाच्या शौर्याचे कौतुक करत आहेत.

VIDEO: रेल्वे रूळ ओलांडताना एक व्यक्ती थोडक्यात बचावला, Video मध्ये पहा RPF जवानाने कसे वाचवले त्याचे प्राण
RPF Jawan Video

मुंबईतील एका स्टेशनवर एक व्यक्ती रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना त्याच ट्रॅकवर एक ट्रेन आली. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) च्या जवानाने त्या व्यक्तीला पटकन वरच्या बाजूला ओढले. काही सेकंदही उशीर झाला असता तर त्याला ट्रेनची धडक बसली असती. ट्रेन जवळ येताच जवानाने तरुणाला सुखरूप बाहेर काढले. आरपीएफ जवानाच्या तत्परतेमुळे तो व्यक्ती थोडक्यात बचावला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये अनेक लोक आरपीएफ जवानाच्या शौर्याचे कौतुक करत आहेत. आरपीएफनेही एक निवेदन जारी करून जवानाच्या या कारवाईचे कौतुक केले आहे. भारतीय रेल्वेवरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ कर्मचारी जबाबदार असतात आणि अपघात टाळण्यासाठी ते अनेकदा स्वत:चा जीव ही धोक्यात घालतात.

पाहा व्हिडिओ -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2023 08:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).