Pune Crime: पुण्यात गुन्हेगारीच्या घटना थांबायच नावचं घेत नाही. गुन्हेगारीच्या वाढते प्रमाण पाहून सामान्य जनतेच्या सुरक्षेतवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. नागरिकांमध्ये घबराटीचे प्रमाण देखील वाढत आहे. दरम्यान शुक्रवारी पुणे शहारातील प्रसिध्द बुधवार पेठेतील क्रांती चौकात एका तरुणाची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आले आहे. हेही वाचा- पुण्यात बर्थडे सेलिब्रेशनवरुन हॉटेलमध्ये राडा;
मिळालेल्या माहितीनुसार, नईम शेख असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. याच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी कलाम उर्फ रुबेल शेख याला अटक केले आहे. फरास खान पोलिस ठाण्यात या प्रकरणी कारवाई चालू आहे. बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पश्चिम बंगालमधील एक महिला येथे राहायला आली. आरोपी कलाम शेख तिचा पती असून सहा महिन्यांपूर्वी महिलेने नईम सोबत विवाह केला होता. त्यानंतर दोघेही एकच राहत होते. पत्नीने दुसऱ्यासोहत लग्न केल्याने कलाम चिडला होता. त्याला या गोष्टीचा राग अनावर झाल्याने कलाम पत्नीसह नईमवर पाळत ठेवून होता.
शुक्रवारी वेळ साधून नईमला कलामने बुधवार पेठेतील क्रांती चौकात सागर बिल्डींगजवळ घेरलं आणि त्याने खिश्यातून वस्तरा काढला आणि नईमच्या गळ्यावर सपासप वार केला. आरडाओरड केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला आणि घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली.नईनला रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, आरोपीची शोधात लागले. पोलिसांनी चक्र फिरवत आरोपीला पुणे रेल्वे स्थानकावरून पकडले.