Crime (PC- File Image)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गोळीबार, मारहाणीच्या गंभीर घटना वारंवार समोर येत आहेत. पुण्यात देखील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून पोलिसांचा त्यांच्यावर वचक नसल्याचे दिसून येत आहे.  काही दिवसापुर्वीच पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी आयुक्त पदाचा कार्यभार (Pune Crime news)  स्वीकारताच शहरातील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केली. पोलीस आयुक्तालयात गेल्या 2 दिवसांपासून शहरातील सर्व गुन्हेगारी टोळ्यांतील सराईत गुन्हेगारांची परेड घेण्यात आली. मात्र तरी देखील शहरातील गु्न्हेगारी काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. पुण्यातील एका हॉटेलमध्ये जोरदार राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ( हेही वाचा - Nashik Crime: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी दोघांना अटक, नाशिक शहरातील घटना)

पुण्यातील डेक्कन परिसरातील क्रेझी सिझलर हॉटेलमध्ये हॉटेल मॅनेजर आणि ग्राहकात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. यावेळी 20 जणांच्या टोळक्याने एकाला बेदम मारहाण केली. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होत आहे.

या हॉटेलमध्ये एक कुटुंब मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. मात्र या ठिकाणी सेलिब्रेशनला फक्त मुलगी आणि आई अश्या दोघांनाच परवानगी होती. या दरम्यान मुलीच्या पायाला लागल्याने तिच्या वडिलांनी हॉटेल चालकांना यासंबंधी जाब विचारला. यावरुनच दोघांमध्ये जोरदार बाचाबाची होऊन तुफान हाणामारी झाली.