Nashik Crime: नाशिक शहरात अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी नाशिक शहर पोलिसांनी बुधवारी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपासून पीडित मुलीचा शाळेच्या वाटेवर पाठलाग करत होते आणि अश्लिल हावभाव देखील करत होते.या घटनेची माहिती पीडित मुलींने आईला दिली होती त्यानंतर घटना उघडकीस आली.( हेही वाचा- लग्नाच्या रात्रीचं वधूला सोडून गेला नवरदेव; )
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने भद्रकाली पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार केली. पीडितेच्या आईने तक्रारात म्हटंल्याप्रमाणे, पीडित मुलीच्या शाळेच्या वाटेवर दोघें जण पाठलाग करत होते. त्यानंतर दोघांन्ही अश्लिल हावभाव दाखवले. मुलीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि तिचा विनयभंग केला. मंगळवारी तक्रार दाखल केल्यानंतर बुधवारी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केले. पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केल्यानंतर घटनेची कबुली दिली. दोघांवर मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर नाशिक शहरात खळबळ उडाली. शाळेतील या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे शाळेतील व्यस्थापनावर लक्ष ठेण्यास सांगितले जात आहे. मागच्या वर्षात एका प्रियकराने अल्पवयीन मुलीला गरोदर केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आरोपीला पोस्को कायद्यांतर्गत अटक केले होते.