Bihar: सध्या देशभरात लग्नाचा हंगाम आहे. दररोज जोडपे लग्नाच्या गाठी बांधत आहेत आणि एक नवीन इनिंग सुरू करत आहेत, पण याच दरम्यान बिहारमध्ये लग्नाशी संबंधित एक प्रकरण समोर आले आहे, जे जाणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या धक्कादायक घटनेत बँक कर्मचारी असलेला नवरदेव लग्नाच्या अवघ्या एक दिवसानंतर बेपत्ता झाला आहे. लग्न करणारी वधू त्याची वाट पाहत आहे, पण वर गायब झाला आहे. या वृत्ताने दोन्ही पक्षांच्या कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली आहे. या घटनेची तक्रार कुटुंबीयांनी अहियापूर पोलीस ठाण्यात केली आहे. बेपत्ता बँक कर्मचाऱ्याच्या मोबाईलच्या सीडीआर विश्लेषणाच्या आधारे पोलीस त्याचा शोध घेण्यात व्यस्त आहेत. भागलपूरच्या एसबीआय बँकेत काम करणारा अहियापूर पोलीस स्टेशन परिसरातील शाहबाजपूर गावात राहणारा शाही आदित्य लग्नासाठी त्याच्या घरी आला होता. 4 तारखेला त्यांचे लग्न झाले आणि आज त्यांचे रिसेप्शन होणार होते, मात्र त्यापूर्वीच तो घरातून पळून गेला. अखेर पोलिसांनी नवरदेवाला पकडले आहे. (हेही वाचा - 'माझा नवरा आंघोळ करत नाही, दात घासत नाही, मला घटस्फोट हवा आहे'; कोर्टात पोहोचल नवरा-बायकोच भांडण, न्यायाधीशांनी दिला 'हा' निर्णय)
सुहागरात की सेज पर दुल्हन को छोड़कर फरार हुआ बैंककर्मी दूल्हा, एक गलती से पुलिस ने कर लिया काबू ! #News pic.twitter.com/41UmbYsFNT
— News18 Bihar (@News18Bihar) February 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)