'माझा नवरा आंघोळ करत नाही, दात घासत नाही, मला घटस्फोट हवा आहे'; कोर्टात पोहोचल नवरा-बायकोच भांडण, न्यायाधीशांनी दिला 'हा' निर्णय
Shower, Divorce (Photo Credit- Pixabay)

Husband-Wife Fight: सामान्यतः घटस्फोटाचे (Divorce) कारण घरगुती हिंसाचार, विवाहबाह्य संबंध किंवा हुंड्यासाठी छळ हे असतात. त्यामुळे पती-पत्नी वेगळे होतात. पण स्वच्छतेवरून कोणी कोणाला घटस्फोट देऊ शकतं का? हे कल्पनेपलीकडचे आहे. पण एका तुर्की (Turkey) महिलेने आपल्या पतीवर शरीराची स्वच्छता करत नसल्याने खटला दाखल केला आहे.

पतीच्या कृत्याला कंटाळून महिलेने मागितला घटस्फोट -

महिलेने दावा केला आहे की, तिचा नवरा कधीही आंघोळ करत नाही आणि दात घासत नाही. आंघोळ न केल्यामुळे त्याच्या संपूर्ण शरीराला दुर्गंधी येत राहते. दिवसभर त्याच्या घामाचा वास येत राहतो. एवढेच नाही तर तो आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच ब्रश करतो. याला कंटाळून महिलेने अंकारा येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. तिने कोर्टात सांगितले की, तिचा पती सलग 5 दिवस तेच कपडे परिधान करतो. त्यामुळे त्याच्या अंगातून सतत दुर्गंधी येत असते. (हेही वाचा -HC On Mental Strain: आर्थिक मर्यादेबाहेरची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पतीवर दबाव आणणे हे मानसिक तणावाचे कारण; दिल्ली उच्च न्यायालयाचे निरीक्षण)

कार्यालयातील सहकाऱ्यांनी दिली साक्ष -

कोर्टाच्या सुनावणीत महिलेच्या दाव्याला पुष्टी देण्यासाठी साक्षीदारही सादर करण्यात आले. सर्व साक्षीदारांना महिलेचे दावे खरे असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने महिलेची घटस्फोटाची विनंती मान्य केली. वैयक्तिक स्वच्छतेच्या कमतरतेसाठी महिलेचा पती 5 लाख तुर्की लीरा म्हणजेच 13.68 लाख रुपये भरपाई देईल, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. (हेही वाचा -HC On Husband's Impotency And Wife: पतीची नपुंसकता पत्नीसाठी वेगळे राहण्याचे पुरेसे कारण; छत्तीसगड उच्च न्यायालयाचे निरीक्षण)

महिलेच्या वकिलाने तुर्की वृत्तपत्र सबाला सांगितले की, पती-पत्नीमधील नाते हे भागीदारीचे नाते आहे, त्यामुळे त्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी. एका पक्षामुळे दुसऱ्या पक्षाचे जीवन दयनीय झाले तर दुसऱ्या पक्षाला घटस्फोटाची याचिका दाखल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याचवेळी, कोर्टातील साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, महिलेचा पती 7 ते 10 दिवसांतून एकदाच आंघोळ करतो आणि आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच दात घासतो, त्यामुळे त्याच्या शरीराला आणि तोंडाला दुर्गंधी येते.

तथापी, तिच्या पतीविरुद्ध साक्ष देणाऱ्या महिलेच्या सहकर्मचाऱ्यांनी सांगितले की, तो तिच्याजवळ बसून काम करत असताना त्याला दुर्गंधी येत होती. त्यामुळे कार्यालयात त्याच्याजवळ कोणीही बसत नव्हते.