HC On Husband's Impotency And Wife: छत्तीसगड उच्च न्यायालयाने अतिशय महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. पतीची नपुंसकता हे पत्नीला वेगळे राहण्यासाठी पुरेसे कारण आहे आणि अशा परिस्थितीत, ती कलम 125 CrPC अंतर्गत भरणपोषणासाठी पात्र असेल. न्यायमूर्ती पार्थ प्रतिम साहू यांच्या खंडपीठाने पतीने कौटुंबिक न्यायालय, जशपूरच्या आदेशाला आव्हान देणारी फौजदारी पुनरीक्षण याचिका फेटाळून लावली. प्रतिवादी-पत्नीने तिच्या पतीकडून (याचिका-सुधारणाकर्ता) CrPC च्या कलम 125 अंतर्गत भरणपोषणाची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. कारण लग्नानंतर तिच्या पतीने शारीरिक संबंध स्थापित केले नव्हते. तिला तिच्या वैवाहिक हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले होते. दुसरीकडे, पतीच्या वकिलाने युक्तीवाद केला की, पतीने आपल्या पत्नीला, त्याच्या शारीरिक अक्षमतेबद्दल, विवाहापूर्वी स्पष्टपणे कळवले होते. (हेही वाचा - Jharkhand HC Quotes Manusmriti: झारखंड हायकोर्टाकडून आदेशात मनूस्मृतीचा उल्लेख, म्हटले 'पती, सासू-सासरे यांची सेवा करणे पत्नीचे कर्तव्य')
Husband's Impotency Sufficient Reason For Wife To Reside Separately; She Is Entitled To Maintenance U/S 125 CrPC: Chhattisgarh HC | @ISparshUpadhyay#ChhattisgarhHighCourt #Maintenance #Section125CrPChttps://t.co/1lDIFURXl2
— Live Law (@LiveLawIndia) January 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)