आज मुंबईत मध्यरात्रीपासून उद्यापर्यंत दोन दिवसांचा मेगाब्लॉक (Megablock) असणार आहे. काही गाड्या अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे घरून निघण्यापूर्वी ट्रेनचे वेळापत्रक नीट जाणून घ्या. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड, हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी आणि पश्चिम मार्गावरील सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान रविवारी दिवसभर मेगाब्लॉक असणार आहे. नाहूर ते मुलुंड दरम्यान पुलांचे गर्डर टाकण्याच्या कामासाठी हा ब्लॉक शनिवारी रात्री 1.10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. यानंतर ते दुसऱ्या रविवारी सकाळी 5.15 मिनिटांपर्यंत राहील.
यादरम्यान रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. यादरम्यान काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. काही लोकल ट्रेन 15 मिनिटे उशिराने धावतील. शनिवारी रात्री सुरू झालेला हा मेगाब्लॉक रविवारी दिवसभर सुरू राहणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान वर आणि खाली स्लो ट्रॅकवर सकाळी 11 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक राहणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर धीम्या लोकल धावतील. हेही वाचा RBI Banned 5 Banks: आरबीआयने 'या' 5 बँकांवर घातली बंदी; महाराष्ट्रातील 2 बँकाचा समावेश, तुमच्या बँकेचं यात नाव नाही ना? चेक करा
पण त्यांच्या निश्चित स्थानकांवर थांबतील.काही फेऱ्या रद्द केल्या जातील तर काही गाड्या उशिराने धावतील. तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान मेगाब्लॉक राहणार आहे. सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर दरम्यानच्या अप आणि डाऊन फेऱ्या रद्द राहतील. मुंबई-वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. बेलापूर-खारकोपर आणि नेरळ-खारकोपर दरम्यानच्या लोकल त्यांच्या निश्चित वेळापत्रकानुसार धावतील.
पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव फास्ट ट्रॅकमध्ये वर आणि खाली मार्गावर मेगाब्लॉक राहील. सकाळी 10 ते दुपारी 3 असणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावरून धावतील. काही बोरिवली लोकल गोरेगावपर्यंतच धावतील. त्यामुळे गाड्याही उशिराने धावणार आहेत. नाहूर ते मुलुंड स्थानकादरम्यान नाइट मेगाब्लॉक राहणार आहे. शनिवारी मध्यरात्री 1.20 ते रविवारी पहाटे 5.15 पर्यंत असणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान स्थानिक फेरी रद्द राहतील. हेही वाचा Devendra Fadnavis On China Factory: आगामी काळात भारतही चीनप्रमाणे कारखाना म्हणून विकसीत होईल- देवेंद्र फडणवीस
याचा परिणाम मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर होणार आहे. कोणार्क एक्स्प्रेस ठाणे स्थानकापर्यंत धावणार आहे. हावडा-सीएसएमटी मेल दादर स्थानकापर्यंत धावेल. तर शालीमार एक्सप्रेस, विशाखापट्टणम-LTT एक्सप्रेस, मंगलोर-सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस, गोरखपूर-एलटीटी एक्सप्रेस, हैदराबाद-सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस या गाड्या एक तास उशिराने धावतील.
मध्य रेल्वेचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान रात्रीचा मेगाब्लॉक असणार आहे. ट्रॅक दुरुस्ती आणि सर्व्हिसिंगसाठी 27 फेब्रुवारीपासून हा ब्लॉक अनिश्चित काळासाठी राहणार आहे. त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या मार्गावरील पाच लोकल फेऱ्या आणि तीन फेऱ्या अंशत: रद्द करण्यात येत आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत हे नियम लागू राहतील.