Maharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या
Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

Maharashtra: पुणे स्टेशनवर आर्मी ब्रिगेडियर रँकच्या 58 वर्षीय अधिकाऱ्याने रविवारी चालत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. हा अधिकारी शहरातील सशस्त्र सैन्य वैद्यकीय महाविद्यालयात (AFMC) तैनात होता. अनंत नाईक असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. अनंत नाईक हे आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या सरकारी गाडीतून पुणे रेल्वे स्टेशन येथे आले होते.

अनंत नाईक यांनी गाडी चालक बोडके याला एमसीओ मधून जाऊन येतो, असं सांगितलं. आणि नाईक पुणे रेल्वे स्टेशनमध्ये गेले. नाईक यांनी सकाळी 12.45 मिनिटांनी उद्यान एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या इंजिन पुढे येऊन आत्महत्या केली. ही घटना रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर घडली. (वाचा - Mumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक)

पोलिस अधीक्षक (जीआरपी) सदानंद वायसे पाटील म्हणाले की, नाईक रेल्वे स्थानकात आले. दुपारी 12.15 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उद्यान एक्सप्रेस ट्रेनसमोर उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली. त्याच्याजवळ कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये नाईक प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर रेल्वेसमोर उडी मारण्याचा प्रयत्न करताना दिसले.

दरम्यान, मृत ब्रिगेडियर अनंत नाईक यांचा मुलगा अभिषेक नाईक याला फोनवर वडीलांच्या आत्महत्येविषयी सांगण्यात आलं. अभिषेकने वडिलांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्याची विनंती केली आहे. आज नाईक यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.