कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार नियमांचे उल्लंघन करण्याच्या सुचना दिल्या जात आहेत. अशातच आता मुंबई पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी पर्यंत 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. तर 400 जणांना अटक केली असून अन्य 195 जणांना नोटीसा धाडण्यात आल्या आहेत. तर सात जणांचा शोध अद्याप लागलेला नाही.(Mumbai: भांडूप, पवई आणि कांजूरमार्ग येथील अत्यावश्यक सेवासुविधांची दुकाने 19 एप्रिल पासून 'या' वेळेत सुरु राहणार)
एकूण 256 एफआयआर 602 जणांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. यामधील अधिकाधिक 71 प्रकरणात नागरिकांनी मास्क घातला नव्हता. तर आणखी 71 जणांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याने ही कारवाई केली गेली आहे. त्याचसोबत अन्य 60 प्रकरण ही अत्यावश्यक सेवासुविधा न पुरवणारी दुकाने आणि 11 हॉटेल्सची आहेत. आणखी अन्य जणांच्या विरोधात क्वारंटाइनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. डीसीपी चैतन्य एस यांनी असे म्हटले की, नागरिकांमध्ये संचारबंदीच्या आदेशाबद्दल गांभीर्य दिसून येत नाही आहे. याच कारणामुळे आम्ही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करत आहोत.(Mumbai Police: मुंबईत आता केवळ अत्यावश्यक सेवेची स्टिकर्स लावलेल्या वाहनांनाच पेट्रोलपंपांवर इंधन मिळणार? महत्वाची माहिती आली समोर)
दरम्यान, मुंबईतील 95 टक्के नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात आहे. मात्र 5 टक्के लोकांकडून त्याचे उल्लंघन केले जात असल्याने याचा अन्य जणांवर परिणाम होत आहे. त्यामुळे मला असे वाटते की संपूर्ण लॉकडाऊन लागू करावा असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. त्याचसोबत जे लोक कुंभ मेळ्यावरुन संबंधित राज्यात परतत आहेत त्या राज्यांना कोरोना हा प्रसाद म्हणून मिळणार आहे. या सर्व नागरिकांनी संबंधित राज्यात स्वत:च्या पैशांनी क्वारंटाइन व्हावे. तर मुंबईत सुद्धा आम्ही त्या लोकांना क्वारंटाइमध्ये ठेवण्याचा विचार करत असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले आहे.