Mumbai Police: मुंबईत आता केवळ अत्यावश्यक सेवेची स्टिकर्स लावलेल्या वाहनांनाच पेट्रोलपंपांवर इंधन मिळणार? महत्वाची माहिती आली समोर
Petrol Pump | Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) 15 दिवासांचा लॉकडाऊन (Lockdown) असतानाही मुंबईच्या (Mumbai) रस्त्यावर अत्यावश्यक सेवेच्या (Essential Service) नावाखाली अनेक गाड्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. दरम्यान, मुंबईत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना कलरकोड (Essential Stickers) देण्याचा निर्णय घेतला आहे. यातच कलरकोड संदर्भात सोशल मीडियावर एक माहिती व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या मॅसेजनुसार मुंबईच्या पेट्रोल पंपावर केवळ अत्यावश्यक सेवेची स्टिकर्स असलेल्या वाहनांनाच पेट्रोल दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ही संपूर्ण माहिती खोटी असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे मुंबई पोलिसांनी आवाहन केले आहे.

मुंबई केवळ अत्यावश्यक स्टिकर्स असलेल्या वाहनांना इंधन देण्यात यावे अशा सूचना मुंबई पोलिसांनी पेट्रोलपंपावर दिल्या आहेत, अशी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही संपूर्ण माहिती खोटी आहे. तरीदेखील नागरिकांनी अत्यावश्यक गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुंबई पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून पोलिसांना केले आहे. हे देखील वाचा- COVID19 नियंत्रणासाठी मुंबई पोलिसांकडून वाहनांची कडक तपासणी

मुंबई पोलिसांचे ट्वीट-

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वाहनांना लाल रंग देण्यात आला आहे. याचबरोबर भाजीपालाच्या गाडीसाठी हिरवा रंग आणि इतर अत्यावश्यक सेवेसाठी पिवळा रंग ठरवण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेच्या वाहनांवर 6 इंच गोल सर्कल लावण्याच्या सूचना पोलीस आयुक्त यांनी दिल्या आहेत.