
घरणी नदीत (Gharni River) एका नवजात बालिकेचा मृतदेह सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना लातूर (Latur) जिल्ह्यातील चाकुर (Chakur) तालुक्यात गुरुवारी घडली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून आरोपींचा शोध सुरु आहे. नदीत अर्भक वाहत असल्याचे पाहून एका ग्रामस्थानी त्याठिकाणी धाव घेतली. त्यानंतर त्याने हे अर्भकाचे मृतदेह बाहेर काढून याची माहिती चाकूर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून यासंदर्भात चौकशीला सुरुवात केली. हे अर्भक एका बालिकेचे असल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे.
स्त्री आणि पुरुष यांना समान मानले जावे यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. तरीदेखील अजूनही काही भागांत स्त्री आणि पुरुषात भेदभाव केला जात आहे. यातच लातूर येथे घडलेल्या घटनेने सर्वांच लक्ष वेधून घेतले आहे. लातूर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यात एका नवजात बालिकेचा मृतदेह आढळ्याने आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी बालिकेचा मृतदेह नालेगाव हेल्थ सेंटरमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. तसेच नदीलगत राहत असणाऱ्या ग्रामस्थाकांची अधिक चौकशी केली जात आहे. हे देखील वाचा- नागपूर: शासकीय रुग्णालयाच्या इमारतीचा भाग कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू, पोलिसांकडून पुढील तपास सुरु
चाकुर पोलिस ठाण्यातील अधिकारी जयवंत चव्हान यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी घरणी नदी ठिकाणी राहत असलेल्या ग्रामस्थांनी अर्भक सापडल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत बालिकेचे अर्भक ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.