नागपूर: शासकीय रुग्णालयाच्या इमारतीचा भाग कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू, पोलिसांकडून पुढील तपास सुरु
Nagpur Government Hospital (Photo Credits-ANI)

नागपूर येथील एका शासकीय रुग्णालयातील त्वचाविज्ञान विभागाचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन महिला जखमी झाल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच इमारतीचा भाग कोसळल्याने काहीजण अडकले असल्याची शक्यता व्यक्ती केली जात आहे. तर पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.या प्रकरणाची अधिक माहिती देत नागपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त बीजी गायकर यांनी असे म्हटले आहे की, इमारतीचा भाग कोसळून मृत्यू झालेला व्यक्ती हा या रुग्णालयाती पेशंट होता. तसेच अन्य दोन महिला ही जखमी झाल्या असून या रुग्णालयाबाबत चौकशी केली जाणार आहे.

ANI Tweet: 

तर या वर्षात मुंबईसह अन्य राज्यात इमारती कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर ऑक्टोंबर महिन्यात विरारमध्ये कोपरी नित्यानंद नगर भागात एका जुन्या इमारतीचा भाग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या इमारतीचा काही भाग अचानक कोसळल्याने एकच गोंधळ उडाला होता. इमारती कोसळत असल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे बोलले जात आहे.