Coronavirus Update: महाराष्ट्रात तुमच्या जिल्ह्यात, मनपा विभागात कोरोनाचे किती रुग्ण आहेत? पहा संपुर्ण आकडेवारी
Coronavirus Outbreak | Representational image (Photo Credits: Pixabay)

Coronavirus Update In Maharashtra: कालच्या दिवसभरात राज्यात 11,514 कोरोना व्हायरस संक्रमित नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, 316 जणांचा मृत्यू झाला. यानुसार महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची एकूण संख्या 4,79,779 वर पोहचली आहे. यापैकी 1,46,305 रुग्ण हे अ‍ॅक्टिव्ह (Coronavirus Positive Cases) आहेत तर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्यांंची संंख्या 3,16,375 इतकी आहे. दुर्दैवाने आजवर 16,792 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. ZydusCadila च्या COVID 19 विरूद्ध संभाव्य लसीचे पहिल्या टप्प्यातील निष्कर्ष समाधानकारक6 ऑगस्ट पासून दुसर्‍या टप्प्याला सुरूवात

राज्यात मुंंबईत (Coronavirus In Mumbai) आता हळुहळु कोरोना रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे, कालच्या दिवसभरात मुंंबईत अवघ्या 910 कोरोना रुग्णांंची वाढ झाली असुन एकुण कोरोना रुग्णसंख्या 1,20,165 वर पोहोचली आहे. आतापर्यंत शहरात 92,661 रुग्ण बरे झाले आहेत. अशीच सुधारणारी परिस्थिती महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात सुद्धा पाहायला मिळत आहे. तुम्ही राहत असणार्‍या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे जाणुन घेण्यासाठी खालील तक्ता तपासुन पाहा.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई मनपा १२०१५० ६६४८
ठाणे १४६८१ ३७०
ठाणे मनपा २२०२३ ७८२
नवी मुंबई मनपा १९०७४ ४८१
कल्याण डोंबिवली मनपा २४३११ ४९४
उल्हासनगर मनपा ७२७६ १७७
भिवंडी निजामपूर मनपा ३९४९ २७६
मीरा भाईंदर ९५६१ २९९
पालघर ४२५१ ५७
१० वसई विरार मनपा १३१२७ ३२९
११ रायगड १०८०४ २७४
१२ पनवेल मनपा ८०७१ १८४
ठाणे मंडळ एकूण २५७२७८ १०३७१
नाशिक ४४९३ १२९
नाशिक मनपा १२०३३ ३०२
मालेगाव मनपा १५२८ ९०
अहमदनगर ४०२२ ६३
अहमदनगर मनपा ३४१८ २३
धुळे १७५८ ६१
धुळे मनपा १७१२ ५४
जळगाव ९६४१ ४६६
जळगाव मनपा ३३९० १०९
१० नंदुरबार ७२७ ४३
नाशिक मंडळ एकूण ४२७२२ १३४०
पुणे १२०३७ ३६२
पुणे मनपा ६६६४८ १६७०
पिंप्री-चिंचवड मनपा २५६६८ ४६४
सोलापूर ५१८३ १६६
सोलापूर मनपा ५३८२ ३९०
सातारा ५०१४ १५७
पुणे मंडळ एकुण ११९९३२ ३२०९
कोल्हापूर ६०९० १३७
कोल्हापूर मनपा १५६१ ५३
सांगली १५३९ ५२
सांगली मिरज कुपवाड मनपा २३९५ ५४
सिंधुदुर्ग ४३३
रत्नागिरी १९९५ ६९
कोल्हापूर मंडळ एकुण १४०१३ ३७२
औरंगाबाद ४३२४ ७२
औरंगाबाद मनप १०८९४ ४५८
जालना २०८७ ७९
हिंगोली ६८९ १५
परभणी ४७२ १७
परभणी मनपा ३४५ १५
औरंगाबाद मंडळ एकूण १८८११ ६५६
लातूर १८२३ ७४
लातूर मनपा ११३९ ५४
उस्मानाबाद १७२९ ५९
बीड ११८७ २५
नांदेड १४३१ ४३
नांदेड मनपा ११८७ ५३
लातूर मंडळ एकूण ८४९६ ३०८
अकोला १००२ ४६
अकोला मनपा १८१३ ८१
अमरावती ५३१ २४
अमवरावती मनपा २०२६ ५३
यवतमाळ १२५२ ३२
बुलढाणा १६६३ ४६
वाशीम ७८० १७
अकोला मंडळ एकूण ९०६७ २९९
नागपूर २२६४ ३२
नागपूर मनपा ४६८६ १३७
वर्धा २५२
भंडारा ३१८
गोंदिया ४६७
चंद्रपूर ४८८
चंद्रपूर मनपा १५४
गडचिरोली ३६०
नागपूर मंडळ एकूण ८९८९ १८४
इतर राज्य ४७१ ५३
एकूण ४७९७७९ १६७९२

दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने 20 लाखाचा टप्पा पार केला आहे. मागील 24 तासांत देशात 62,538 नव्या रुग्णांची वाढ झाली असुन देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 20,27,075 वर पोहोचली आहे. देशात मृतांची एकूण संख्या 41,585 वर पोहोचली आहे. देशात सद्य घडीला 6,07,384 रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत 13,78,106 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.