Mumbai Rains Traffic Update: मुंबईत पावसाचे पाणी साचल्याने हिंदमाता, अंधेरी, मालाड सहित 'या' ठिकाणी वाहतुक बंंद
Mumbai Monsoon (Photo Credits: Twitter)

Mumbai Monsoon Update: मुंंबई सह उपनगरात काल पासुन पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे, आज सुद्धा सकाळपासुन मुसळधार पाउस सुरु आहे.  मुंंबईतील अनेक सखल भागात पाणी साचल्याचे समोर येत आहे. परेल (Parel) , हिंंदमाता (Hindmata) , अंधेरी (Andheri)  येथे कंबरेहुन वर पाणी साचल्याचे सुद्धा दृश्य पाहायला मिळतंय. तर गोरेगाव, मिरा रोड या ठिकाणी सुद्धा अनेक घरात, दुकानात पाणी शिरले आहे. अशावेळी मुंंबई वाहतुक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) पाणी साचलेल्या भागातील वाहतुक बंद करत असल्याची माहिती दिली आहे. पाणी ओसरेपर्यंत पुढील काही तास हिंदमाता फ्लाय ओव्हर, अंधेरी सब वे (Andheri Subway), मालाड सब वे (Malad Subway) , मिलान सब वे (Milan Subway), शिंदेवाडी (Shindewadi) , दादर टीटी (Dadar TT) , किंग सर्कल (Kings Circle) या भागात वाहनांची वाहतुक बंद असेल. अशावेळी आवश्यकता भासल्यास मुंंबई पोलिसांशी 100 या क्रमांकावर संंपर्क साधुन मदत मिळवा असे आवाहन पोलिसांकडुन करण्यात आले आहे.मुंंबईत पावसामुळे पाणी साचुन झालेल्या परिस्थितीचे फोटो आणि व्हिडिओ पाहा.

दुसरीकडे पावसामुळे मुंबई शहर व उपनगरातील विविध भागातील 8 मार्गांवर बेस्ट बस सेवा वळविण्यात आल्या आहेत. दादर आणि प्रभादेवी येथे मुसळधार पावसामुळे विरार-अंधेरी-वांद्रे व वांद्रे-चर्चगेट दरम्यान लोकल सेवा बंद केल्या आहेत. उपनगराच्या दरम्यान विशेष लोकल चालविली जात आहे तर मध्य आणि हार्बर मार्गावर सुद्धा लोकलची वाहतुक कोलमडुन पडली आहे.Mumbai Local Trains: मुसळधार पावसाचा मुंबई लोकल ट्रेनवर मोठा परिणाम

पहा ट्विट

दरम्यान, मागील 10 तासात मुंंबईत 230 मिमी पावसाची नोंंद झाली आहे,  पुढील 48 तास ही परिस्थीती कायम राहणार असल्याने मुंंबई, ठाणे सहित कोकणाला आयएमडीने रेड अलर्ट जारी केला आहे.