Mumbai Rain Update: मुंबई मध्ये जोरदार पाऊस; परेल, हिंदमाता भागात साचले पाणी, समता नगर येथे भूस्खलन (See Photos & Videos)
Mumbai Water Logging (Photo Credits: ANI)

Mumbai Monsoon Update:  मुंबई सह उपनगरात मागील 10 तासात 230 मिमी पावसाची नोंद झाली आहे, आज सुद्धा सकाळपासुन पावसाने चांगलाच जोर धरलाय, यामुळे मुंबईतील सखल भाग म्हणजेच परेल (Parel), हिंदमाता (Hindmata)  परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.  तर,समता नगर पोलिस स्थानकाजवळ भुस्सखलन (Land Slide) झाल्याचे अपडेट सुद्धा हाती येत आहे. काल रात्री पासुन सुरु झालेला हा पाउस आणखीन 48 तास कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. IMD उपमहासंचालक के.एस. होसाळीकर (K.S. Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंंबई (Mumbai), ठाणे (Thane), व उत्तर कोकणासाठी (North Konkan) सध्या रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे मुंंबई पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही मार्गावरील लोकल (Mumbai Locals) सेवा व मुंंबई मधील BEST बस सेवा सुद्धा कोलमडुन पडली आहे. खाली दिलेल्या ट्विट मध्ये आपण मुंंबईतील पावसाची दृश्य पाहुन स्वतःच आजच्या परिस्थितीचा अंदाज लावु शकता.

अशातच आज मुंंबईच्या समुद्रात 12:47 वाजता 4.51 मीटर उंच लाटा उसळणार आहेत,अशा वेळी नागरिकांंनी घरातुन बाहेर पडु नये अशी सुचना बीएमसीकडुन करण्यात आली आहे. अतिवृष्टीचा अंदाज पाहता आपत्कालीन सेवा वगळता सर्व कार्यालये व अन्य आस्थापने आज बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

मुंंबई मध्ये मुसळधार पावसामुळे साचले पाणी, पहा फोटो

पश्चिम दृतगती मार्ग मुसळधार पावसाने ठप्प

समता नगर पोलिस स्थानकाजवळ भुस्सखलन

दरम्यान, होसाळीकर यांंनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही तासात कुलाबा येथे 220, सांताक्रूझ 254, राम मंदिर 152, मीरा रोड 152, महालक्ष्मी 172, विद्याविहार 159 मिमी. ठाणे व एनएम मधील बहुतांश स्थानकांवर 150 mm मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.