Lockdown: लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध 366 गुन्हे दाखल तर 198 जणांना अटक
Advisory for WhatsApp Users by Maharashtra Cyber | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Lockdown: लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध 366 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत 198 जणांना अटक करण्यात आली आहे. यात आक्षेपार्ह WhatsApp मेसेजेस फॉरवर्ड प्रकरणी 155 गुन्हे, फेसबुक (Facebook) पोस्ट्स शेअर प्रकरणी 143, टिकटॉत (Tiktok) व्हिडिओ शेअर प्रकरणी 16 आणि ट्विटर (Twitter) द्वारे आक्षेपार्ह ट्विट प्रकरणी 6, इन्स्टाग्राम (Instagram) द्वारे चुकीच्या पोस्ट प्रकरणी 4, तर अन्य सोशल मीडियाच्या गैरवापरा प्रकरणी 42 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी 102 आक्षेपार्ह पोस्ट्स काढून टाकण्यात सायबर विभागाला यश आलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये बीड 35, पुणे 29, जळगाव 26, मुंबई 21, कोल्हापूर 16, नाशिक 15, सांगली 14, ठाणे शहर 13, बुलढाणा 12, जालना 12, नाशिक शहर 11, सातारा 10, पालघर 10, लातूर 10, नांदेड 10, परभणी 8, नवी मुंबई 8, सिंधुदुर्ग 7, अमरावती 7, ठाणे 7, नागपूर शहरातील 7 प्रकरणांचा समावेश आहे. (हेही वाचा - महाराष्ट्र: स्थलांतरित कामगारांना मुंबई येथून पश्चिम बंगालला जाण्यासाठी 7 रेल्वे गाड्यांना ममता बॅनर्जी यांनी परवानगी द्यावी- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस)

देशात तसेच राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर आतापर्यंत देशात तीनवेळा लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. परंतु, या कालावधीत अनेक गुन्हेगार व समाजकंटकांकडून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी आक्षेपार्ह पोस्ट शेअर करून अफवा पसरवल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 198 जणांना अटक केली आहे.