महाराष्ट्र: स्थलांतरित कामगारांना मुंबई येथून पश्चिम बंगालला जाण्यासाठी 7 रेल्वे गाड्यांना ममता बॅनर्जी यांनी परवानगी द्यावी- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis | (Photo Credits: ANI)

देशभरासह महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार आहेत. कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा पाहून नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. परंतु लॉकडाउनमुळे विविध राज्यात अडकलेल्या मजूर आणि स्थलांतरित कामगारांना आपल्या घरी जाण्यासाठी केंद्र गृहमंत्रालयाने श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता स्थलांतरित कामगार वर्गाला आपल्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु मुंबईत (Mumbai)  अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना पश्चिम बंगाल (West Bengal) येथे जाण्यासाठी 7 रेल्वे  गाड्यांना ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी परवानगी द्यावी असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी असे म्हटले आहे की, पश्चिम बंगालच्या सरकारकडे स्थलांतरित कामगारांना मुंबईहून घेऊन जाण्यासाठी 7 रेल्वे  गाड्यांना  परवानगी द्यावी.  मात्र तरीही अद्याप एकाही गोष्टीला परवानगी दिली नसून ममता दीदी यांनी त्यासाठी लवकरात लवकर परवानगी द्यावी अशी अपेक्षा आहे. राज्यात विविध ठिकाणी अडकलेले स्थलांतरित कामगारांना आपल्या जिल्ह्यात परतण्यापूर्वी त्यांना फिटनेस सर्टिफिकेट आणि रजिस्ट्रेशन करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.(Coronavirus: महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात किती आहेत कोरोना रुग्ण, जाणून घ्या आजचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर)

दरम्यान, आज वंदे भारत मिशन मधील दुसरे विमान सिंगापूर येथून मुंबईत दाखल झाले आहे. या विमानाने जवळजवळ 243 जणांना सिंगापूर येथूण आपल्या मायदेशी आणण्यात आले आहे. तर लॉकडाउनमुळे कामगार, मजूर, प्रवाश्यांसह विद्यार्थी सुद्धा अडकले आहेत. परंतु प्रत्येकाला आपल्या घरी पोहचता यावे यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.