Coronavirus In Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

भारतात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून सद्य स्थितीत देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 62,939 वर पोहोचली आहे. यात 41,472 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून 19,358 रुग्ण बरे झाल्याची माहिती मिळत आहे. तर आतापर्यंत देशात एकूण 2109 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. यात सर्वाधिक लोकसंख्या ही महाराष्ट्र जिल्ह्यात असून सद्य स्थितीत महाराष्ट्रात 20, 228 कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. यात काल 1165 नव्या रुग्णांची भर पडली असून 48 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सद्य स्थितीत कोरोना बाधितांची एकूण संख्या 779 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा तसेच वैद्यकिय यंत्रणा कार्यरत आहे. Coronavirus: महाराष्ट्र पोलीस दलातील 786 कर्मचारी COVID-19 पॉझिटीव्ह; 88 अधिकाऱ्यांसह 698 पोलिसांचा समावेश

पाहूया महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांची जिल्हानिहाय आकडेवारी:

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 12864 489
2 ठाणे 110 2
3 ठाणे मनपा 800 8
4 नवी मुंबई मनपा 789 4
5 कल्याण डोंबिवली मनपा 316 3
6 उल्हासनगर मनपा 20 0
7 भिवंडी निजामपूर मनपा 21 2
8 मीरा भाईंदर 201 2
9 पालघर 32 2
10 वसई विरार मनपा 216 9
11 रायगड 89 1
12 पनवेल मनपा 137 2
ठाणे मंडळ एकूण 15595 524
1 नाशिक 50 0
2 नाशिक मनपा 73 0
3 मालेगाव मनपा 472 20
4 अहमदनगर 51 2
5 अहमदनगर मनपा 9 0
6 धुळे 8 2
7 धुळे मनपा 42 1
8 जळगाव 111 12
9 जळगाव मनपा 22 2
10 नंदुरबार 19 1
नाशिक मंडळ एकूण 857 40
1 पुणे 118 5
2 पुणे मनपा 1938 141
3 पिंप्री-चिंचवड मनपा 132 3
4 सोलापूर 6 0
5 सोलापूर मनपा 184 10
6 सातारा 98 2
पुणे मंडळ एकुण 2513 161
1 कोल्हापूर 13 1
2 कोल्हापूर मनपा 6 0
3 सांगली 32 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 3 1
5 सिंधुदुर्ग 5 0
6 रत्नागिरी 17 1
कोल्हापूर मंडळ एकुण 77 3
1 औरंगाबाद 5 0
2 औरंगाबाद मनपा 437 12
3 जालना 12 0
4 हिंगोली 58 0
5 परभणी 1 1
6 परभणी मनपा 1 0
औरंगाबाद मंडळ एकूण 514 13
1 लातूर 25 1
2 लातूर मनपा 0 0
3 उस्मानाबाद 3 0
4 बीड 1 0
5 नांदेड 3 0
6 नांदेड मनपा 30 3
लातूर मंडळ एकूण 62 4
1 अकोला 9 1
2 अकोला मनपा 134 10
3 अमरावती 4 1
4 अमवरावती मनपा 78 11
5 यवतमाळ 95 0
6 बुलढाणा 24 1
7 वाशीम 1 0
अकोला मंडळ एकूण 345 24
1 नागपूर 2 0
2 नागपूर मनपा 222 2
3 वर्धा 0 0
4 भंडारा 1 0
5 गोंदिया 1 0
6 चंद्रपूर 1 0
7 चंद्रपूर मनपा 3 0
8 गडचिरोली 0 0
नागपूर मंडळ एकूण 230 2
1 इतर राज्य 35 8
एकूण 20228 779

महाराष्ट्रात मुंबई, पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईतील धारावी, वरळी, दादर आदी ठिकाणं हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत.

दरम्यान महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातील अधिकाऱ्यांसह एकूण 786 कर्मचारी COVID19 पॉझिटीव्ह आढळले आहेत. कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित 786 जणांपैकी 703 जणांवर रुग्णालात उपचार सुरु आहेत. 76 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारल्याने आणि बरे वाटू लागल्याने त्यांना रुग्णालातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 7 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट लिहून ही माहिती दिली आहे.