Maharashtra Police | (File Photo)

महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातील अधिकाऱ्यांसह एकूण 786 कर्मचारी COVID19 पॉझिटीव्ह आढळले आहेत. कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित 786 जणांपैकी 703 जणांवर रुग्णालात उपचार सुरु आहेत. 76 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारल्याने आणि बरे वाटू लागल्याने त्यांना रुग्णालातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 7 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट लिहून ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 786 कोरोना पॉझिटीव्ह कर्मचाऱ्यांमध्ये एकूण 88 पोलीस अधिकारी तर 698 पोलिसांचा समावेश आहे. 88 पैकी 75 पोलीस अधिकाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 13 अधिकारी आणि 63 पोलीसांची प्रकृती उपचारानंतर सुधारली आहे. त्यांना बरे वाटू लागल्याने रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे.

महाराष्ट्र पोलिसांना कोरोना व्हायरस लागण झाल्याची आकडेवारी वाढती आहे. त्याचप्रमाणे पोलिसांवरील होणाऱ्या हल्ल्यांचीही संख्या वाढती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांवर हल्ल्याच्या एकूण 200 घटना घडल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 732 आरपींना अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा, Coronavirus: महाराष्ट्रात आतापर्यंत 714 पोलिसांना कोरोनाची लागण- Maharashtra Police)

एएनआय टविट

दरम्यान, महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 20228 इतकी नोंदवली गेली आहे. त्यापैकी 15979 रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरु आहेत. 3470 रुग्णांची प्रकृती उपचारानंतर सुधारली. त्यामुळे त्यांना बरे वाटू लागल्याने रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 779 कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला आहे.