CM Eknath Shinde | Twitter/CMO

CM Eknath Shinde Visited CSM Hospital: ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील महापालिका संचालित छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) रुग्णालयात आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गेल्या शनिवारपासून मृतांची संख्या 21 वर पोहोचली आहे. तसेच अधिकाऱ्यांनी गंभीर नसलेल्या रुग्णांना हलविण्यास सुरुवात केली असून त्यांना जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (CSM) रूग्णालयाला भेट दिली आणि ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी विविध सुविधा निर्माण करण्यासाठी 71 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. तसेच मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

राजकीय क्षेत्रात असलेल्या ठाण्यातील सीएसएम रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू वेदनादायक असून त्यांनी सर्व पक्षांना या विषयावर राजकारण करणे टाळण्यास सांगितले आहे. ठाण्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (आरोग्य सेवेचे प्रभारी) संदीप माळवी यांनी पीटीआयला सांगितले की, सोमवारी सकाळी संपलेल्या 24 तासांच्या कालावधीत नागरी रुग्णालयात आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. (हेही वाचा -Conjunctivitis in Mumbai: महाराष्ट्रामध्ये 'डोळे येणे' आजारामध्ये वाढ; मुंबईमध्ये 13 दिवसात आढळली 3000 प्रकरणे)

सीएसएम हॉस्पिटलमध्ये शनिवार आणि रविवार या 24 तासांच्या कालावधीत 18 मृत्यूची नोंद झाली होती, त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी मृत्यूच्या क्लिनिकल पैलूची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. यासह गेल्या शनिवारपासून महापालिकेच्या सुविधा केंद्रात 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार सीएसएम हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण येतात. या रुग्णालयात दररोज सुमारे 600 रूग्णांवर उपचार केले जातात.

शहरालगत असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलचे नूतनीकरण केले जात असल्याने त्याचा भार कळव्याच्या सुविधेवर पडतो, असे ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हाकवे यांनी सांगितलं. सीएसएम रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलची क्षमता 350 खाटांची असून त्याची व्याप्ती सुमारे 50 टक्के आहे, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.