मुंबईतील (Mumbai) एका 31 वर्षीय गृहिणीला सायबर फसवणूक (Cyber Crime) करणार्यांच्या टोळीने 3.85 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केली आहे. आरोपींनी गृहीणीला सांगितले की, तिने 55 लाख रुपयांची लॉटरी (Lottery) जिंकली आहे. हे सांगण्यासाठी ते कौन बनेगा करोडपती (KBC) वरून कॉल करत आहेत. त्यांनी तिला इतर विविध शुल्कांसह प्रोसेसिंग फी म्हणून 3.85 लाख रुपये भरण्यास सांगितले. महिलेने 22 नोव्हेंबर रोजी चर्नी रोड (Charney Road) येथील व्हीपी रोड पोलिस ठाण्यात (VP Road Police Station) सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. तिच्या तक्रारीनुसार ती पती, दोन मुले आणि सासरच्यांसोबत राहते. तिचा नवरा फराळ विकण्याचे दुकान चालवतो.
16 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता तिला एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअॅपवर फोन आला. फोन करणारी एक महिला होती जिने स्वत:ची KBC मधील नीता म्हणून ओळख दिली आणि तिला सांगितले की तिने 55 लाखांची लॉटरी जिंकली आहे. लॉटरीची रक्कम काढण्यासाठी तिने तक्रारदाराला फोन नंबर दिला. हेही वाचा Mumbai Crime: मुंबईमध्ये 18 वर्षाआधी दाखल केलेल्या गुन्ह्यातील आरोपी सीबीआयच्या ताब्यात, अनेक कंपनीला घातला लाखोंचा गंडा
तक्रारदाराने दिलेल्या नंबरवर कॉल केल्यावर दुसऱ्या व्यक्तीने उचलून तिला प्रोसेसिंग फी म्हणून 9000 रुपये भरण्यास सांगितले. तिला चेकवर प्रक्रिया करण्यासाठी, चलन डॉलरमधून रुपयात रुपांतरित करण्यासाठी इतर विविध शुल्कांसह पैसे देणार्या वेगवेगळ्या व्यक्तींना बोलावण्यात आले. तिने 3.85 लाख रुपये दिले. त्यानंतर फसवणूक करणारे आणखी पैसे मागत राहिले. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे या महिलेच्या लक्षात आले आणि तिने स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली. तपास सुरू आहे.